25.8 C
Latur
Tuesday, July 2, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यातून निघणार सर्वधर्मीय ऐक्याची दिंडी

पुण्यातून निघणार सर्वधर्मीय ऐक्याची दिंडी

पुणे : प्रतिनिधी
सध्या समाजामध्ये जातीपातीवरून वाद सुरू आहेत. त्यामुळे सर्वधर्मीय एकोपा राहण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढण्यासाठी सर्वधर्मीय ऐक्य दिंडी महत्त्वाची ठरणार आहे. पालखी सोहळा रविवारी पुण्यात येत असून, सोमवारी ही ऐक्याची दिंडी पंढरीकडे निघणार आहे.

पंढरपूर वारीनिमित्त सोमवारी पुण्यात सर्वधर्मीय ऐक्य दिंडी आयोजित करण्यात आली आहे. मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक, रिझवानी मस्जिद ट्रस्ट, सुफी वारकरी विचारमंच आणि साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर यांच्या विद्यमाने दि. १ जुलै रोजी सर्वधर्मीय ऐक्य दिंडीचे आयोजन सकाळी साडेदहा वाजता करण्यात आले आहे.

साखळीपीर तालीम(नाना पेठ) येथे सर्वधर्मीय धर्मगुरु, डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. पी. ए. इनामदार, साखळीपीर तालीमचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर यांच्या उपस्थितीत प्रारंभ होणार असून अंगरशा बाबा दर्गा मार्गे रिझवानी मस्जिद (गंज पेठ) येथे समारोप होणार आहे. सहभागी वारक-यांना व्हेज बिर्याणी, शीरखुर्मा वाटप करण्यात येणार आहे. डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटीच्या वतीने वारक-यांना रेनकोट वाटप करण्यात येणार आहेत. दिंडीचे हे पाचवे वर्ष आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR