22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमहायुतीत श्रेयवादाची लढाई!

महायुतीत श्रेयवादाची लढाई!

नव्याने तोंड फुटले भाजपने राष्ट्रवादी आमदाराच्या नामफलकावर काळे फासले

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत सगळं काही अलबेल असल्याचे दिसत नाही आहे. श्रेय वादावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपामध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. यापूर्वी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात जगदीश मुळीकने राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरेवर श्रेय लाटल्याचा आरोप केला होता. तर, आज हडपसर मतदारसंघात भाजपच्या पदाधिका-यांनी नाराजी व्यक्त करत हडपसर उड्डाण पुलाच्या नामफलकला काळे फसले आहे. राष्ट्रवादी श्रेय लाटण्याचे काम करत असल्याचा आरोप माजी सरपंच शिवराज घुले आणि छाया गदादे यांनी केला आहे. त्यामुळे महायुतीत फूट पडण्याची शक्यता बोली जात आहे.

महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या सरकारमध्ये कुठे ना कुठे संघर्ष पाहायला मिळत आहे. पक्षाच्या जबाबदार नेत्यांकडून करण्यात येणारी वक्तव्य आणि आरोपांमुळे महायुतीमध्ये फूट पडण्याची शक्यता अधिक बळावली गेली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांच्या अर्थ खात्या येवढे नालायक खात कोणते नाही, असे विधान केले होते. तर मला राष्ट्रवादीसोबत बैठकीला बसल्यानंतर उलट्या येतात असेही विधान शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी केले होते. शिवसेना पक्षाचे वरिष्ठ नेते अशा प्रकारचे विधान करत असताना पुण्यात आज राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये श्रेय वाद पेटलेला पाहायला मिळाला.

भाजपच्या आमदारांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याच्या प्रयत्न करणा-या हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत भाजप पदाधिका-यांनी मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकाला काळे फासून आंदोलन केले. महायुतीचा धर्म राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराकडून पाळला जात नसल्याने निषेध व्यक्त करण्यात आला, राज्यात नेते एकी दाखवत असताना हडपसरच्या महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. आंदोलकांनी पालकमंत्री अजित पवारांना निवेदन देऊन नाराजी व्यक्त करणार असल्याचे सांगितले.

पदाधिका-यांना डावलल्याचा आरोप
हडपसर विधानसभा मतदारसंघात पेयजल योजना, रेल्वे उड्डाणपूल व मांजरीचा नदी उड्डाणपूल यासाठी योगेश टिळेकर यांच्या पाठपुराव्यातून निधी मिळालेला असताना विद्यमान आमदार भाजपच्या पदाधिका-यांना डावलून श्रेय लाटत आहेत, असा आरोप शिवराज घुले यांना यावेळी केला. मांजरी उड्डाणंपुलासाठी सुमारे २३ कोटी रुपये मंजूर असताना केवळ १४ कोटी ६० लाख रुपये खर्च करून बाकीचा निधी परत पाठविला.

आमदारांचा हस्तक्षेप वाढला?
विद्यमान आमदाराच्या हस्तक्षेपामुळे पुलाची रुंदी व उंची कमी झाल्याने भविष्यात वाहतुककोंडीचा धोका निर्माण होईल असा आरोप नगरसेवक बाळासाहेब घुले यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस हडपसरमध्ये भाजपला वारंवार डावलत असून आम्ही महायुती धर्मास तिलांजली देणार असा इशारा आंदोलकांनी दिला. भाजप आणि राष्ट्रवादी समोरासमोर आल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR