बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीतील एका पंजाब राज्यातील मजुराचा मृत्यू झाला आहे. केज येथील रोडवर संबंधित कामगाराचा मृतदेह सापडला असल्याचे समोर आले आहे. सदर कामगाराचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पंजाब राज्यातील गुरुदास नावाचा कामगार हा केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करीत होता. त्याचे नाव रचपाल हमीद मसीह असून तो पंजाब राज्यातील गुरुदासपूर येथील रहिवासी आहे. केज शहरातील केज अंबाजोगाई रोडवर असलेल्या चांदणी बार समोर त्याचा मृतदेह रस्त्यावर पडला असल्याचे आढळून आले. केज पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ताब्यात घेतला आहे.