नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्या घटनेने खळबळ उडाली आहे. बायकोच नव-याच्या जिवावर उठली आहे, प्रॉपर्टी हडपण्यासाठी पत्नीने साथीदारांच्या मदतीने कट रचत पतीला मारण्याचा प्रयत्न केला आहे.
नाशिकच्या बोरगड परिसरातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीअर पाजून पत्नीने पतीला सर्पदंश करून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेत सुदैवाने पीडित पतीचा जीव वाचला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
नाशिकच्या बोरगड परिसरात ही घटना घडली आहे. पत्नीने संपत्ती हडपण्यासाठी पतीच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर येत आहे. पत्नीने आधी पतीला बीअर पाजली, त्यानंतर त्याला सर्पदंश करून मारण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान तिने पतीचा गळा देखील आवळला, त्यानंतर त्याला सर्पदंश करण्यात आला.
या सर्वांमधून देखील पती वाचला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पत्नीने बीअर पाजून सर्पदंश करविला, तसेच डोक्यात हेल्मेटनेही मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी महिला आणि तिच्या दोन अज्ञात साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. सोनी ऊर्फ एकता जगताप असे या आरोपी महिलेचे नाव आहे, तर विशाल पाटील असे या घटनेतील पीडित पतीचे नाव आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.