17.7 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeमहाराष्ट्रपाण्याची तपासणी न करताच परतले केंद्रीय पथक

पाण्याची तपासणी न करताच परतले केंद्रीय पथक

 पुण्यात नागरिकांचा संताप

पुणे : प्रतिनिधी
शहरात गुइलेन बॅरे सिंड्रोम रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक पुण्यात दाखल झाले. मात्र, संबंधित भागातील विहिरी आणि पाण्याची तपासणी न करताच पथक परत गेल्याने नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरात ‘जीबीएस’ रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही स्थानिकांनी या आजाराचा आणि पाणीप्रदूषणाचा संबंध असण्याची शक्यता वर्तवली. त्यामुळे त्यांनी आरोग्य पथकाकडे विहिरीच्या पाण्याची तपासणी करण्याची मागणी केली.

मात्र, कोणतीही तपासणी न करता पथक निघून गेल्याने नागरिक आक्रमक झाले.
दरम्यान, स्थानिकांनी पथकाची गाडी अडवल्यानंतरच त्यांनी पाण्याची पाहणी केली. नागरिकांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, तातडीने सर्व जलस्रोतांची तपासणी करावी, अशी मागणी केली आहे. या प्रकरणी महापालिका आणि आरोग्य विभागाकडून अधिकृत स्पष्टीकरण मिळालेले नाही. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनावर त्वरित कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR