हैदराबाद : येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये एक मोठी दुर्घटना झाली आहे. व्हिस्टेक्स एशिया या कंपनीचा सिल्व्हर ज्युबली सोहळा सुरू असताना स्टेजवरुन पडून कंपनीचे सीईओ संजय शाह यांचा मृत्यू झाला.
व्हिस्टेक्स एशिया कंपनीने या मेगा सेलिब्रेशनसाठी बोलावण्यात आलेल्या कर्मचा-यांची राहण्याची सोय देखील फिल्म सिटीमधील हॉटेलमध्ये केली होती. ही दुर्घटना घडली तेव्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी सुमारे ७०० लोक उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी एक विशिष्ट स्टेज बनवण्यात आलं होतं. हे स्टेज क्रेनच्या मदतीने २० फूट उंच उचललं होतं. यासाठी ६ मि.मी. जाड लोखंडी तारांचा वापर करण्यात आला होता. मात्र दुर्दैवाने यातील एक तार तुटली, आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली अशी माहिती पोलीस निरीक्षक ए. मनमोहन यांनी दिली.