मुंबई : मुख्यमंत्र्यांना घशाचे इन्फेक्शन झाले आहे, ज्या तपासण्या घरी करता येत नाहीत त्यामुळे ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले. मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढू नयेत. जे अर्थ काढत आहेत त्यांना स्थिरस्थावर झाल्यावर त्याच भाषेत उत्तर देऊ. असे शिंदे गटाचे आमदार शंभुराज देसाई म्हणाले आहेत.
दरम्यान, राज्यात सत्तास्थापनेपूर्वी घडामोडींना वेग आला आहे. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वैद्यकीय तपासणीसाठी ज्युपिटर रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. याच दरम्यान, आमदार शंभ्ुराज देसाई मुंख्यमंत्र्यांच्या आजारपणाची माहिती पत्रकारांना देताना पुढे म्हणाले, उबाठाच्या बैठकीत काय झालं याच्याशी काही घेणंदेणं नाही. त्यांचा स्वभाव म्हणजे ‘झालं काम करा लांब’ ही भूमिका आहे. त्यांनी काय करावं हा त्यांचा निर्णय आहे.
उद्धव ठाकरेंची भूमिका ‘झाले काम करा लांब’
उबाठाच्या बैठकीत काय झालं याच्याशी आमचं घेणंदेणं नाही. त्यांनी आमच्या घरात डोकावू नये. त्यांचा स्वभाव म्हणजे ‘झालं काम करा लांब’ ही भूमिका आहे. त्यांनी काय करावं हा त्यांचा निर्णय आहे. उद्धव ठाकरेंनी त्याच वेळी अशा प्रकारे आमदार, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला असता तर ही वेळ आली नसती. आम्ही युतीचा भगवा यावेळी पालिकेवर फडकवू अशी प्रतिक्रिया माजी मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.