25.9 C
Latur
Wednesday, January 1, 2025
Homeअंतरराष्ट्रीयएआय मानवापेक्षा बुद्धीमान होण्याचा धोका

एआय मानवापेक्षा बुद्धीमान होण्याचा धोका

न्यूयॉर्क : जगभरात आजच्या घडीला सर्वांत चर्चिला जाणारा विषय म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) होय. हे तंत्रज्ञान मानवी जीवनात अमूलाग्र बदल घडवणार आहे, यात कोणाच्या मनात शंका नाही. पण एआयमुळे ब-याच निर्माण होणार आहेत, आणि काही तज्ज्ञांच्या मते एआय हे तंत्रज्ञान मानव प्रजाती नष्ट करू शकेल अशी ही भीतीही व्यक्त करतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर एआयचे गॉडफादर अशी ख्याती असलेले नोबेल विजेते संशोधक जेफ्री हिन्टन यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे.

हिन्टन यांनी येत्या ३० वर्षांत एआयमुळे मनुष्य प्रजाती नष्ट होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. असे घडण्याची शक्यता जवळपास १० ते २० टक्के आहे असे ते म्हणाले आहेत. बीबीसी४ या रेडिओ चॅनलला त्यांनी ही मुलाखत दिली आहे. एआयमुळे मनुष्य प्रजाती नष्ट होण्याचा धोका ३ टक्के आहे, असे हिन्टन म्हणत होते, तर हिन्टन यांनीच ही शक्यता १० ते २० टक्के असल्याचे म्हटल्याने या वक्तव्याला बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. तुम्ही पाहू शकता की यापूर्वी आपल्याला कधीही आपल्यापेक्षा बुद्धिमान असलेल्या गोष्टींचा सामना करावा लागला नव्हता.

तुम्हाला अशी किती उदाहरणे माहिती आहेत, ज्यात कमी बुद्धिमान गोष्टी अधिक बुद्धिमान गोष्टींवर नियंत्रण ठेवतात? आई आणि मुलाचे उदाहरण घ्या, यात मुलाने आईवर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्क्रांतीने बरेच काम केलेले असते. हिन्टन गुगलमध्ये कार्यरत होते, पण त्यांनी २०२३मध्ये पदाचा राजीनामा दिला. एआयच्या धोक्यांबद्दल मुक्तपणे बोलता आले पाहिजे, यासाठी त्यांनी गुगलमधील पद सोडले होते.

एआय माणसापेक्षा बुद्धिमान असेल आणि हा फारच भीतीदायक विचार आहे. या तंत्रज्ञाच्या विकासाचा वेग फार म्हणजे फारच जास्त आहे आणि यावर सरकारने नियंत्रण ठेवले पाहिजे. तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांवर जस सरकारने सक्ती केली तरच त्या सुरक्षेच्या अंगाने जास्त काम करतील असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR