23.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeअंतरराष्ट्रीयजगातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेला कर्जाचा विळखा

जगातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेला कर्जाचा विळखा

वॉशिंग्टन : जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला अमेरिका देश अडचणीत सापडला आहे. अमेरिकेवर असलेले कर्ज गेल्या २४ वर्षांत सहा पटीने वाढले आहे. सन २००० मध्ये अमेरिकेवर ५.७ ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज होते, जे आता ३४.२ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे. यूएस काँग्रेसच्या बजेट दस्तऐवजानुसार, पुढील दशकापर्यंत देशाचे कर्ज ५४ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. गेल्या तीन वर्षांत कर्जात १० ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

रिपोर्टनुसार, सरकारचे उत्पन्न घटत असून खर्च वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. तज्ज्ञांच्या मते ही अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी चांगली गोष्ट नाही. असे मानले जात आहे की, अमेरिकेचे कर्ज-ते-जीडीपी गुणोत्तर पुढील काही वर्षांत २०० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. म्हणजे देशाचे कर्ज अर्थव्यवस्थेच्या दुप्पट होईल. असे झाले तर कर्ज फेडण्यात अमेरिकेला खुप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. यामुळे सरकारला संशोधन आणि विकास, पायाभूत सुविधा आणि शिक्षणावर होणा-या एकूण खर्चापेक्षा व्याज भरण्यासाठी जास्त पैसा खर्च करावा लागेल. देशाची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असताना आणि बेरोजगारी कमी असताना अमेरिकेचे कर्ज वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. सामान्यत:, जेव्हा अर्थव्यवस्था कमकुवत असते तेव्हा सरकार विकासाला चालना देण्यासाठी खर्च वाढवते.

वाढत्या कर्जाबाबत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटमध्ये अनेकदा वाद होतात. मात्र, दोन्ही पक्षांच्या कार्यकाळात देशातील कर्ज वाढले आहे. त्याचा परिणाम देशाच्या पतमानांकनावर दिसू लागला आहे. फिचने ऑगस्टमध्ये अमेरिकेच्या कर्जाचे रेटिंग एए+ वरून एएए पर्यंत कमी केले. तसेच नोव्हेंबरमध्ये मूडीजने अमेरिकेच्या एएएमध्ये कपात करण्याचा इशारा दिला होता. गेल्या वर्षी जूनमध्ये अमेरिका डिफॉल्टच्या उंबरठ्यावर पोहोचली होती, आता पुन्हा एकदा ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये निव्वळ व्याज, गेल्या वर्षीच्या तुलनेत ३९ टक्क्यांनी वाढला आहे, तर २०२० च्या तुलनेत दुप्पट झाले आहे.

अमेरिकेवर रेकॉर्ड-ब्रेक कर्जाचा भार
जगभरात महासत्ता म्हणून मिरवणा-या अमेरिकेची स्थिती येत्या काही काळात आणखी बिकट होऊ शकते. देशावर कर्जाचा भात वाढत चालला असून अमेरिकेच्या कर्जाच्या रकमेने विक्रमी उच्चांक गाठला असून देशाच्या फेडरल सरकारचे एकूण राष्ट्रीय कर्ज ३४ ट्रिलियन डॉलरच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. अशा परिस्थितीत, आगामी काळात देशाचा ताळेबंद सुधारण्यासाठी सरकारला राजकीय आणि आर्थिक आघाडीवर अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल अशी चिन्हे दिसत आहेत.

कर्ज ३४ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचणार
अमेरिकेवरील कर्जाचा भार खूप वेगाने वाढला असून काँग्रेसच्या बजेट कार्यालयाने जानेवारी २०२० मध्ये आर्थिक वर्ष २०२८-२९ मध्ये एकूण फेडरल कर्ज ३४ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवला होता, परंतु २०२० मध्ये कोविड संसर्गामुळे कर्ज अपेक्षेपेक्षा जादा या पातळीवर पोहोचले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR