24.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeअंतरराष्ट्रीयविमान हवेत असतानाच निखळला दरवाजा

विमान हवेत असतानाच निखळला दरवाजा

नायगारा : विमान हवेत असतानाच त्याचा दरवाजा उघडल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. पण विमान हवेत असताना त्याचा दरवाजा चक्क निखळून खाली पडल्याची बातमी ऐकून तुम्हाला धक्का नक्कीच बसला असेल. ही दुर्घटना खरी असून अमेरिकेतील नायगारा येथे हा प्रकार घडला आहे.

नायगारा फ्रन्टिअर ट्रान्सपोर्टेशन ऑथरिटीने सांगितले की, चिकतोवागा विमानतळावरुन बफेलो आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उड्डाण केलेल्या एका छोट्या आणि नॉन कमर्शिअल विमानाबाबत ही दुर्घटना घडली आहे. या घटनेनंतर त्याचे बफेलो विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. संध्याकाळी ६ वाजता ही दुर्घटना घडली. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच त्याचा मागचा दरवाजा उघडला आणि तो खाली कोसळला.

विमानाने उड्डाण केले त्यावेळी त्यात दोन प्रवाशी आणि एक पायलट होते. स्टिगलमिअर पार्कवरुन विमान जात असताना त्याचा दरवाजा निखळून खाली कोसळला अशी माहिती वैमानिकाने दिली आहे. या दुर्घटनेनंतर कोणतीही जीवितहानी तसेच वस्तूचे किंवा संपत्तीचे नुकसान झालेले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR