लातूर : लातूर शहरातील सिटी बसचालक आणि वाहकाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या मारहाणीचा व्हीडीओ देखील समोर आला आहे. या प्रकरणात लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूरमध्ये एका सिटी बसचालक आणि वाहकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले आहेत. किरकोळ कारणावरून एका गटाकडून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारहाणीचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल…
लातूरच्या गंगापूर गावात सिटी बसचालक आणि वाहक यांना काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, यामध्ये चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले आहेत. गंगापूरच्या भर चौकात चालक आणि वाहकाला लाठ्या-काठ्यांनी फ्रीस्टाईल बेदम मारहाण झाल्याने, गंगापूर गावात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मारहाण करणा-यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.