पुणे : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) च्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी ‘रात्रीस खेळ चाले’ ची एवढी बजबजपुरी झाल्यानंतर झाल्यानंतर मालिका बंद होईल असे वाटले होते… पण छे२२ निर्मात्याची मागणी तसा नायिकेचा पुरवठा..!! असे फेसबुक पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे. यात त्यांनी कोणाच्या नावाचा उल्लेख केला नाही. पण मागच्या काही दिवासांपासून रुपाली चाकणकर यांना एकामागोमाग एक मिळणा-या जबाबदा-यांवर त्या प्रश्नचिन्ह उपस्थित करत आल्या आहेत. त्यामुळे हा रोख चाकणकरांवर तर नाही ना? अशी चर्चा सुरु आहे.
अजित पवार यांच्या पक्षातील रुपाली विरुद्ध रुपाली वाद टोकाला पोहोचला आहे. पक्षामध्ये एक नेता एक पद द्यायला हवे असे असताना रुपाली चाकणकरांना इतकी पदे देऊन का ठेवली आहेत? असा प्रश्न उपस्थित करत रुपाली पाटील यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.
बाई काय हा प्रकार..किती वेळा तेच ते..’ याने त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टची सुरुवात केली आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ ची एवढी बजबजपुरी झाल्यानंतर झाल्यानंतर मालिका बंद होईल असं वाटलं होतं… पण छे२२ निर्मात्याची मागणी तसा नायिकेचा पुरवठा..!! असे ते आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात. तोच तो डर्टी पिक्चर किती वेळा बघायचा…? दया कुछ तो गडबड है. दालमें कुछ काला नही पुरी दालही काली है भाई, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत रुपाली ठोंबरे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत. आपली भूमिका रोखठोकपणे मांडण्यासाठी त्या ओळखल्या जातात. दरम्यान त्यांच्याच पक्षातील महिला नेत्या रुपाली चाकणकर यांना काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. यानंतर रुपाली पाटील ठोंबरे या नाराज झालेल्या पाहायला मिळाल्या.
रुपाली चाकणकर यांना देण्यात आलेल्या जबाबदारीला पक्षातूनच विरोध होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. रुपाली ठोंबरे यांनी आपली नाराजी उघडपणे जाहीर केली. माझ्यासह अनेक महिला चांगल्या पदे मिळू शकतात. असे असताना एकाच महिलेला जास्त पदे का? असा प्रश्न त्यांनी विचारला.
रुपाली ठोंबरे पाटील एवढ्यावरच थांबल्या नाहीत. तर एक व्यक्ती एक पद नियमानुसार रुपाली चाकणकर यांच्याकडील महिला प्रदेशाध्यक्षपद काढून घ्या, अशी मागणीदेखील त्यांनी केली होती. रुपाली चाकणकर यांनी मला मी बाहेरची असल्याचे म्हटले. त्याने मी दु:खी झाल्याचे रुपाली ठोंबरे म्हणाल्या. मी जर बाहरेची असेल तर मी बाहेरच जाते. मी तुम्हाला पक्षप्रवेश दिला आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे काम करा, असे मला अजित दादांनी सांगितल्याचे रुपाली ठोंबरे म्हणाल्या.