छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनानंतर सरकराने तातडीने अध्यादेश काढता मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला असल्याचा दावा केला जात आहे. तर, मराठा समाजाला याच मोठा फायदा होणार असून, आरक्षणाचा लढा यशस्वी झाला असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, यावरच प्रतिक्रिया देताना माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मात्र, राज्य शासनाने मराठा समाजाची फसवणूक केली असल्याचं म्हटले आहे. तसेच, दिल्ली शिवाय आरक्षण शक्य नाही असेही जाधव म्हणाले आहेत.
यावेळी बोलतांना जाधव म्हणाले की, मराठा समाजाला अध्यादेश देऊन राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. अध्यादेश कायद्यामध्ये परिवर्तित करण्याच्या संबंधित भूमिका सहा महिन्याच्या नंतर किंवा अगोदर घेण्याच्या संदर्भात जो विषय आहे.
त्यावर माझा राज्य शासनाला प्रश्न आहे, तुम्ही हे आंदोलन वाशीला पोहोचले तेव्हा नाक दाबून तोंड उघडले अशी परिस्थिती तुमची झाली. तुमचे इंटेन्शन क्लियर असते तर हे आंदोलन सुरू असताना विधानसभेचे लोकसभेचे सभागृह सुरू असताना या संबंधितीचा कायदा क्लिअर केला असता. पण तुम्ही तसे केलेले नाही. म्हणून तुम्ही मराठा समाजाची फसवणूक केली आहे असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही,’ असे हर्षवर्धन जाधव म्हणाले आहेत.