23 C
Latur
Wednesday, December 4, 2024
Homeराष्ट्रीयसरकारलाच संसदीय कामकाज चालू द्यायचे नाही

सरकारलाच संसदीय कामकाज चालू द्यायचे नाही

काँग्रेस नेते जयराम रमेश यांची टीका

नवी दिल्ली : आम्हाला मणिपूर, संभल आणि बेरोजगारीवर चर्चा करायची आहे पण आमच्या नेत्यांना सभागृहात बोलू दिले जात नाही असा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. तसेच सरकारलाच संसदीय कामकाज चालू द्यायचे नाही असेही रमेश म्हणाले.

जयराम रमेश म्हणाले की, दोन्ही सभागृहाचे कामकाज स्थगित झाले, यासाठी जबाबदार कोण? अदानी, मणिपूर, संभल, अजमेर, बेरोजगारी या विषयावंर विरोधक चर्चेची मागणी करत आहेत. पण आमच्या नेत्यांना बोलूच दिले नाही. आज पाचव्या दिवशी सभागृह तहकूब करण्यात आले. संविधान लागू होऊन ७५ वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने दोन दिवसीय चर्चा ठेवावी अशी आम्ही मागणी केली होती. सरकारने ही मागणी मान्य केली पण चर्चेची तारीख जाहीर नाही केली. या सगळ्यात अदानींचा मुद्दा महत्त्वाचा आहे. माझ्या २० वर्षांच्या अनुभवात मी पहिल्यांदा पाहतोय की सरकारलाच संसदीय कामकाज चालू द्यायचे नाही.

तसेच प्रत्येक पक्षाची वेगळे दृष्टिकोन असू शकतात. तृणमूल काँग्रेस इंडिया आघाडीचा भाग आहे असे ते म्हणतात, पण त्यांचे वेगळे अजेंडे वेगळे असू शकतात. अदानींचा मुद्दा मोठा नाहि आहे असे तृणमूलने कधीच म्हटलेले नाही आहे असेही रमेश यांनी नमूद केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR