22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुतीचा १६५ जागांवर विजय होईल

महायुतीचा १६५ जागांवर विजय होईल

विधानसभा निवडणूक : मंत्री हसन मुश्रीफांना विश्वास

कोल्हापूर : प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकीत बहुरंगी लढती होणार असून, महायुतीला १६५ जागा मिळतील असा दावा, राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

या विधानसभेला राष्ट्रवादीचे दोन पक्ष , शिवसेनेचे दोन पक्ष, भाजप, काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष असे अनेक पक्ष आहेत. यामध्ये कोणीही थांबायला तयार नसल्याने बहुरंगी लढती होतील असा दावा मुश्रीफ यांनी केला. राज्यात अजित पवार यांची राष्ट्रवादी तिसरी आघाडी वगैरे काही करणार नाही. आम्ही महायुतीमध्येच लढणार असल्याचा निर्वाळा देखील मुश्रीफ यांनी दिला. आज ते पंढरपुरात श्री विठ्ठल दर्शनासाठी आले होते. त्यावेळी बोलत होते.

राज्यात होणा-या बहुरंगी लढतीत काय करायचे हे जनतेने ठरविले आहे. यंदा राष्ट्रवादी आणि महायुतीला विजयी करण्याचे जनतेने ठरवल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. निवडणुकीनंतर कळेल अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाने कसे काम केले आहे असेही ते म्हणाले. अजित पवार गटाला विधानसभेत मोठे यश मिळणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. आधी महायुतीची सत्ता आणणे महत्त्वाचे असून त्यानंतर मुख्यमंत्री कोण हे ठरेल असेही मुश्रीफ यांनी सांगितले. लोकसभेत ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करून आता लोकात जात असल्याचे त्यांनी सांगितले. या विधानसभेला महायुतीच्या १६५ जागा जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

कोल्हापूर येथील पूरस्थिती गंभीर
कोल्हापूर येथील पूरस्थिती गंभीर असून, काल मुंबई येथे आपण बैठक घेतली होती. आता तुळजापूरचे दर्शन घेऊन थेट कोल्हापूरकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर परिसरात अजून पाऊस थांबला नसल्याने पूरस्थिती गंभीर बनल्याने आता कोल्हापूर येथे थांबून मदतकार्य करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR