19 C
Latur
Sunday, December 29, 2024
Homeपरभणीपांगरा ढोणेतील शेतक-यांचे उपोषण स्थगित

पांगरा ढोणेतील शेतक-यांचे उपोषण स्थगित

पुर्णा : तालूक्यातील पांगरा ढोणे येथील तरंगल शिवारातील गट क्रं ५४ ते ५७ शेताकडे जाणारा चालू स्थितीतील जुनी वहिवाट शेतरस्ता गट क्रं ७३, ७४ च्या शेतमालकांनी जेसीबीच्या साह्याने खोदून नाला काढुन बंद केली होती. सदरील रस्ता पूर्वरत खुला करण्याच्या मागणीसाठी तरंगल शिवारातील शेतकरी आत्माराम ढोणे, उत्तमराव ढोणे, देविदास ढोणे, संतोष ढोणे, भानूदास ढोणे,जळबाजी ढोणे, ज्ञानदेव ढोणे, रामदास ढोणे यांनी शेताच्या बांधावर बसून दि.२४ जानेवारी रोजी अमरण उपोषण सुरू केले होते. यावेळी नाला खोदणा-या शेतक-यांनी पंचनाम्यावर सह्या करीत रस्ता देण्याचे मान्य केल्याने शेतक-यांनी तुर्तास आंदोलन स्थगीत केले आहे.

या उपोषणाच्या ठिकाणी दि.२५ जानेवारी रोजी नायब तहसिलदार प्रशांत थारकर, मंडळ अधिकारी लटपटे, तलाठी रासवे, चुडावा पोलीस स्टेशनचे सपोनि. नरसिंग पोमनाळकर यांनी स्थळ पाहणी केली. धु-यावरील १० फुट रुंदीचा रस्ता जो खोदून बंद केलेला आहे तो खुला करुन देण्यासाठी पुढील आठवड्यात सुनावणी घेवून एमसीआरसी कलम १४३ किंवा मामलेदार अधिनियम १९०३ अन्वे तातडीने निर्णय घेण्यात येईल असे सवार्नूमते ठरले.

सरपंच उत्तमराव ढोणे, पोलीस पाटील प्रतिनिधी अगंद ढोणे व नागरीका समक्ष ७४ गटाचे शेतकरी सखाराम माणिकराव ढोणे, ७३ गटाचे शेतकरी राजाराम पांडूरंग ढोणे यांनी पंचनामा रिपोर्टवर सह्या केल्या. तसेच ७४ गटाचे शेतकरी सखाराम ढोणे यांनी खोदलेल्या नाल्या लगत सवा चार फुट रस्ता देण्याचे सर्वासमोर मान्य केल्या नंतर उपोषण कर्त्यांनी आपले अमरण उपोषण तूर्तास सोडवले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR