28.6 C
Latur
Saturday, March 15, 2025
Homeराष्ट्रीयकैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार

कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार

श्रीनगर : भारत आणि चीनमधील सीमावाद सोडवण्यासाठी दोन्ही देश प्रयत्न करत आहेत. अशातच दोन्ही देशांच्या या प्रयत्नांना यश मिळण्यास सुरुवात केली आहे. चीनने हा वाद सोडवण्यासाठी एक पाऊल टाकले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कैलास मानसरोवर यात्रा पु्न्हा सुरू होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान थेट हवाई सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी तत्त्वत: करार झाला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की भारत व चीनमधील संबंध सुधारण्यासाठी, ते अधिक दृढ होण्यासाठी दोन्ही बाजूने योग्य पावले उचलली जात आहेत. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार आहे.

जून २०२० मध्ये गलवानमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही दशांमधील संबंध बिघडले आहेत. डोकलाममध्ये झालेल्या संघर्षानंतर कैलास मानसरोवर यात्रा थांबवण्यात आली होती. कैलास मानसरोवर यात्रा बंद झाल्यापासून भाविक उत्तराखंडच्या व्यास खो-यातून कैलास पर्वताच्या दर्शनासाठी येत होतो. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात ऑक्टोबर २०२४ मध्ये कझान (रशियातील शहर) येथे झालेल्या बैठकीत यावर सहमती झाली होती. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी व अधिका-यांनी भारत-चीन द्विपक्षीय संबंधांच्या स्थितीचा आढावा घेतला. तसेच, उभय देशांचे संबंध स्थिर करण्यासाठी, पूर्ववर करण्यासाठी काही लोककेंत्रित पावलं उचलण्यावर सहमती झाली आहे. याअंतर्गत दोन्ही देशांनी २०२५ च्या उन्हाळ्यात कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR