32 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeमहाराष्ट्रकोयता गँगच्या म्होरक्याची कोयत्यानेच हत्या

कोयता गँगच्या म्होरक्याची कोयत्यानेच हत्या

इंदापूर : प्रतिनिधी
पुणे शहराप्रमाणे जिल्ह्यात कोयता गँगने दहशत निर्माण केली आहे. पुण्यातील इंदापूरमध्ये शनिवारी धक्कादायक घटना घडली होती. कोयता गँगचा म्होरक्या असलेल्या अविनाश धनवे हा हॉटेलमध्ये जेवणासाठी बसला असताना त्याची हत्या झाली. आधी त्याच्यावर गोळ्या चालवण्यात आल्या. त्यानंतर कोयत्याने त्याची हत्या करण्यात आली.

अविनाश धनवे हा कोयता गँगचा आळंदीमधील म्होरक्या होता. त्याचा अंत कोयत्यानेच झाला. दरम्यान या प्रकरणी धनवे यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून १० जणांविरोधात इंदापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर बा वळणावर हॉटेल जगदंबा आहे. या हॉटेलमध्ये शनिवारी रात्री ८ वाजता अविनाश धनवे इतर तिघे जेवणासाठी आले होते. त्यांनी जेवणाची ऑर्डर दिल्यावर ते गप्पा मारु लागले होते. यावेळी दोन युवक हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी पिस्तूल काढून अविनाशवर गोळ्या चालवल्या. त्यानंतर आणखी काही जण हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी अविनाशवर सपासप कोयत्याने वार केले. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR