बार्शी : पुण्यातील नातेवाइकामार्फत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून सहा महिन्यांत दामदुप्पट पैसे करून देण्याचे आमिष दाखवून रोख व सोन्याचे दागिने घेऊन महिलेची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सुलताना निजाम शेख (रा. ताडसौंदने रोड, बार्शी) यांच्यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटक केली आहे. बार्शी न्यायालयात न्या. जे. आर. पठाण – यांच्यासमोर उभा केल्यानंतर न्यायालयाने १९ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
याबाबत सुनीता विश्वनाथ कोकाटे (रा. गडेगाव रोड, बार्शी) यांनी – पोलिसांत तक्रार दिली आहे. दुप्पट रकमेच्या आमिषाने सुनीता कोकाटे यांनी प्लॉट विक्री केलेले चार लाख व मुलाच्या विम्याचे आलेले सात लाख असे रोख अकरा लाख शेख यांच्या बँक अकाउंटवर पाठविले होते. त्यानंतर सुलताना हिने पुन्हा नातेवाइकाच्या मुलीचे लग्न असल्याने तुमच्याकडील चार तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्या व चार तोळ्यांचे गंठण यांची मागणी करून मी एक महिन्यात परत करते, असेसांगितल्यानंतर रोख व दागिने असे दिले होते.
बरेच दिवस झाले तरी तिने रोख रक्कम व घेतलेले दागिने परत न दिल्याने पोलिसांत तक्रार दिल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, पोलिस हवालदार रेवननाथ भोंग करत आहेत.