23.2 C
Latur
Thursday, July 18, 2024
Homeराष्ट्रीयद. कोरियातील बॅटरी प्लांटला भीषण आग, २० जणांचा मृत्यू

द. कोरियातील बॅटरी प्लांटला भीषण आग, २० जणांचा मृत्यू

सेऊल : दक्षिण कोरियातील बॅटरी प्लांटला लागलेल्या भीषण आगीत २० जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दक्षिण कोरियातील लिथियम बॅटरी प्लांटमध्ये आग लागली.

आग एवढी भीषण होती की, आगीच्या ज्वाला दूरवर पसरत होत्या. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमनच्या गाड्या आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवले असून २० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

दक्षिण कोरियाच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १०.३० च्या सुमारास ही आग लागली. राजधानी सेऊलच्या दक्षिणेला सेओंग येथील लिथियम बॅटरी कारखान्यात ही घटना घडली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. आग लागली तेव्हा कारखान्यात सुमारे ७० लोक उपस्थित होते, असे सांगण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR