28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात अनेक ठिकाणी पारा चाळीशीपार

राज्यात अनेक ठिकाणी पारा चाळीशीपार

पाकिस्तानी वा-यांमुळे महाराष्ट्र तापला उष्णतेच्या लाटेचा इशारा

पुणे : बुधवारी राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद धुळे जिल्ह्यात झाली. धुळ्यात तापमानाचा पारा चाळीशीपार गेला होता. मुंबईतही दिवसभर दमट वातावरण होते. त्यामुळे नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा निघत होत्या.

अनेकांना या उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागला. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून ताशी ३५ ते ४० कि.मी. वेगाने उष्ण वारे गुजरातमध्ये वाहत आहे. दक्षिणोत्तर हवेच्या निर्वात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हे वारे महाराष्ट्रात देखील येत आहे.

परिणामी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टी, सह्याद्री घाटमाथा, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR