22.9 C
Latur
Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्रपीएम केअर फंडातला घोटाळा ७० हजार कोटींच्या घोटाळ्यापेक्षा मोठा

पीएम केअर फंडातला घोटाळा ७० हजार कोटींच्या घोटाळ्यापेक्षा मोठा

उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट भाजपवर केला घणाघाती आरोप

मुंबई : पन्नास खोके घेऊन सत्तेमध्ये गेलेल्यांनी लाडक्या बहिणींना केवळ दीड हजार रुपये देऊ केले आहेत. मी कोविडमध्ये कामे केली पण कधीच म्हटले नाही मिळाले का पैसे? पीएम केअर फंडाबाबत कुणीही बोलत नाही. त्यामध्ये इतके मोठे घोटाळे झालेत की ७० हजार कोटींचा घोटाळाही लाजेल, अशी परिस्थिती आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

मंगळवारी आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करावे मी त्यांना सरसकट पांिठबा देईन. मला पुन्हा येईन असे कधी वाटलेले नाही.. हिंदुत्व हे हिंदुत्व आहे, पण काळानुसार भूमिका घ्याव्या लागतात, मला शेंडी-जानवे आणि घंटा बडवणारे हिंदुत्व नकोय, हे माझे वाक्य नाही बाळासाहेबांचे आहे. बुरसटलेले हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. हे बाळासाहेबांचे विचार आहेत. जो लढा माझ्या आजोबांनी दिला तोच लढा वडिलांनी दिला. लोकांची घरे पेटवणारे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. भाजपला सोडले म्हणजे हिंदुत्व सोडले असे होत नाही. सबका साथ आणि निवडणूक झाली की मित्रांचा विकास, असे भाजपचे आहे.

ही क्रांतीची सुरुवात आहे
राज्यातल्या सत्ताधा-यांबद्दल बोलतना उद्धव ठाकरे म्हणाले की, युती सरकारच्या काळात सत्ता किती काळ होती? कठीण काळात आम्ही साथ दिली, हे लोक माडीवर चढले आणि आता आम्हाला लाथा मारायला लागले आहेत. आज तुम्ही बघा कोणत्याही राजकारण्याकडे न जाणारे विचारवंत, कलाकार मंडळी आम्हाला साथ देत आहेत, ही क्रांतीची सुरुवात आहे.

घोटाळ्यांबाबत कोणीही बोलत नाही
राज्य सरकारने आमच्या हक्काचे पैसे ढापले आहेत आणि बहिणींना म्हणतात मिळाले का पैसे? स्वत: ५० खोके घेतले आणि बहिणींना १५०० फक्त देत आहेत. मी कोविडमध्ये कामे केली पण कधीच म्हटले नाही की, मिळाले का पैसे? पीएम केअर फंडातील घोटाळ्यांबाबत कोणीही बोलत नाही. इतके मोठे घोटाळे झालेत की, आता ७० हजार कोटींचा घोटाळा लाजेल असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघात केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR