23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीय५ किलो बटाट्याची पोलिसाने मागितली लाच

५ किलो बटाट्याची पोलिसाने मागितली लाच

ठाणे प्रभारी निलंबित पोलिसाची ऑडिओ क्लिप व्हायरल

लखनौ : उत्तर प्रदेशातील कन्­नौज जिल्ह्यात लाच मागण्याचा एक अजब प्रकार समोर आला आहे. येथे एका पोलिस कर्मचा-याने प्रकरण मिटवण्यासाठी लाच म्हणून ५ किलो बटाटे मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याची ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये पोलिस कर्मचारी आणि तक्रारदार यांच्यात एका कामासाठी बटाट्यांची लाच देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

कन्नौज जिल्ह्यातील सौरिख पोलिस ठाणे क्षेत्रातील चपुन्ना पोलिस ठाण्याचे प्रभारी रामकृपाल सिंह आणि तक्रारदारांचा ऑडिओ व्हायरल झाला होता. ज्यात लाच म्हणून बटाटे मागण्यात आले होते. संबंधित ऑडियो क्लिपमध्ये पोलिस ठाण्याच्या प्रभारीने प्रकरण मिटविण्यासाठी लाचेच्या रुपात ५ किलो बटाटे मागितले. मात्र, समोरचा व्यक्ती बटाटे देण्यास असमर्थता दाखवत आहे. त्याने केवळ २ किलो बटाटे देण्याची तयारी दर्शवली. मात्र, शेवटी दोघांचे ३ किलो बटाट्यांवर एकमत झाले. हा ऑडियो व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे पोलिस अधिकारीही थक्क झाले आहेत.

पोलिस अधीक्षकांनी ठाणे प्रभारीला निलंबित करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. व्हायरल ऑडियोची पोलिस अधीक्षक अमित कुमार आनंद यांनी दखल घेतली आहे. त्यांनी चौकी प्रभारीला तत्काळ निलंबित केले. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, बटाटे शब्दाचा वापर केवळ भ्रष्टाचाराचा कोड रुपात केला आहे. त्यांनी म्हटले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे व आरोपी पोलिस निरीक्षकाविरोधात विभागीय चौकशी केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR