27 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रआताचे महाराज खरे वारसदार नाहीत

आताचे महाराज खरे वारसदार नाहीत

कोल्हापूर : कोल्हापूरात राजकीय वातावरण तापण्याची जोरदार शक्यता आहे. महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू छत्रपती यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. तर भाजपने खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा संधी दिली. दरम्यान प्रचारसभेदरम्यान खासदार संजय मंडलिक यांचे वादग्रस्त विधान समोर आले आहे. चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत खासदार संजय मंडलिक यांनी हे विधान केले आहे.

संजय मंडलिक म्हणाले आताचे महाराज कोल्हापूरचे आहेत का ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही आणि कोल्हापूरची जनता खरी वारसदार आहेत. माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी ख-या अर्थाने पुरोगामी विचार जपला. संजय मंडलिक यांच्या विधानामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. आता शाहु छत्रपती याला कसे उत्तर देणार हे महत्वाचे आहे. यावेळी व्यक्तिगत टीका टाळा म्हणून हसम मुश्रीफ यांनी सल्ला दिला होता. मात्र प्रचारात व्यक्तिगत टीका होत असल्याची चर्चा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR