27.6 C
Latur
Monday, April 22, 2024
Homeक्रीडारिलायन्स-डिस्ने विलीनीकरणामुळे भारतीय क्रिकेटची समिकरणे बदलणार

रिलायन्स-डिस्ने विलीनीकरणामुळे भारतीय क्रिकेटची समिकरणे बदलणार

मुंबई : भारतीय क्रिकेटवर भविष्यात मोठा परिणाम करणारी एक करार नुकताच झाला. रिलायन्स आणि डिस्रे इंडियाचे विलीनीकरण झाले आहे. याचा भारतातील क्रिकेट प्रक्षेपण क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. यामुळे प्रेक्षकांना सर्व मोठ्या क्रिकेट स्पर्धा एकाच प्लॅटफॉर्मवर म्हणजे जिओ सिनेमावर पहावयास मिळतील.

या विलिनीकरणामुळे बीसीसीआय आणि आयसीसी यांची भागीदारी अजून मजबूत होऊ शकते. जिओ आणि डिस्ने स्टार हे त्यांचे प्लॅटफॉर्म वाढवण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे क्रिकेट ब्रॉडकास्टिंगचे भविष्य उज्वल दिसते.

रिलायन्स इंडस्ट्रिज आणि डिस्ने स्टार इंडियाचे विलीनीकरण मुल्य हे जवळपास ७०,३५२ कोटी रूपयांच्या आसपास आहे. या विलीनीकरणाचा थेट परिणाम हा भारतातील क्रिकेट चाहत्यांवर होणार आहे.

या विलीनीकरणाच्या रणनितीमुळे ज्या पद्धतीने भारतातील चाहते क्रिकेट पाहत होते ती पद्धतच बदलून जाणार आहे. यात पारंपरिक टीव्ही प्रक्षेपण आणि लाईव्ह स्ट्रिम्ािंग यांचा देखील समावेश आहे. क्रिकेटसाठी आता जिओ हा सर्वात प्रमुख डिजीटल प्लॅटफॉर्म असणार आहे.

इंडियन क्रिकेटवर एकाच प्लॅटफॉर्मचे वर्चस्व
रिलायन्स डिजिटलचा जिओ सिनेमा हा प्लॅटफॉर्म भारतातील क्रिकेट स्पर्धांचे स्ट्रिमिंग करणारा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म ठरणार आहे. यात आयपीएल, देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आणि आयसीसीच्या प्रमुख स्पर्धांचा समावेश आहे. तर स्टार स्पोर्ट्स हे भारतातील क्रिकेट सामने टेलिकास्ट करणारे प्रमुख चॅनेल होईल.

दोन दिग्गजांचे विलीनीकरण
रिलायन्स आणि डिस्नेच्या विलीनीकरणाला नुकतेच मूर्तरूप आल्यामुळे डिस्ने हॉटस्टारच्या भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडण्याची प्रक्रिया वेग येऊ शकतो. त्यांच्याकडे सध्या आयसीसी ब्रॉडकॉस्ंिटग हक्क आहेत. हे हक्क भारतात तरी जिओ सिनेमाकडे जातील.

याचबरोबर स्पोर्ट्स 18 आणि रिलायन्सचे इतर स्पोर्ट्स चॅनेल देखील भारतीय क्रिकेट ब्रॉडकास्ंिटग जगतातील मोठे प्लेअर बनू शकतात. भारताच्या द्विपक्षीय मालिका आणि महिला प्रीमियर लीग हे स्टार स्पोर्ट्सवरच पाहिले जाऊ शकतील.

नियमांचा येऊ शकतो अडथळा
रिलायन्स आणि डिस्ने विलीनीकरणचा करार झाल्याचे २८ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आले मात्र आता या प्रक्रियेला कॉम्पेटिशन कमिशन ऑफ इंडिया आणि कायदेशीर संस्थांची देखील परवानगी मिळणे गरजेचे आहे. या प्रक्रियेला जवळपास १० ते १२ महिने लागू शकतात.

त्यामुळे आयपीएल २०२४ आणि जूनमध्ये होणारा टी २० वर्ल्डकप यावर मात्र या विलीनीकरणाचा कोणताही परिणाम होणार नाही. या दोन स्पर्धा स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टारवरूनच प्रक्षेपित होणार आहेत. मात्र या विलीनीकरणामुळे जिओ सिनेमाला चॅम्पियन्स ट्रॉफी प्रक्षेपित करण्याची संधी मिळणार आहे.

याचबरोबर महिला प्रीमियर लीग जिओवर आणि महिलांचे सामने स्टार स्पोर्ट्सवर प्रक्षेपित केले जाऊ शकतात. या नव्या प्लॅटफॉर्मचे नाव जिओ स्टार स्पोर्ट्स असू शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR