परभणी : विद्यार्थ्यांच्या विकासात पालकांची भुमिका निर्णायक आहे. आजच्या आधुनिक काळात बदलती जीवनशैली व तंत्रज्ञानाचे बदलते स्वरूप पाहता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत पालकांनी दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. आज सामाजिक माध्यमांच्या वापरामुळे व माहिती, तंत्रज्ञानाच्या विकासामुळे विद्यार्थी समाज माध्यमांच्या गर्तेत सापडला आहे. या पार्श्वभुमीवर विद्यार्थी व पालकांनी जागरूक राहिले पाहिजे असे प्रतिपादन अशोक उफाडे यांनी केले.
लहुजी साळवे कर्मचारी महासंघ आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात प्रा. पुंडलिक वाघमारे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सी. एम. गाडे, रोहिदास नेटके, रविंद्र लांडगे, सुधाकर बनसोडे यांना समाज गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्य शासनाच्या अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवर नथुराव अंभोरे, विश्वनाथ गवारे, कचरूबा शिंदे, अभिमान मस्के, वेणुताई जोगदंड, देविदास खरात यांना सन्मानित करण्यात आले. तसेच वैभव पाटोळे, राजु पारडे, अनुष्का हिवाळे, दिनेश ताकतोडे, कोमल आरे, कुणाल भारसाखळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रारंभी जालना जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. अनिल कांबळे, डॉ. दिलीप अर्जुने, गणपत भिसे, व्ही.सी. गायकवाड, अशोक उफाडे, एन.एम. लांडगे, प्रा. संजय सांभाळकर, माऊली साळवे, वर्षाताई लांडगे, डॉ. ज्ञानदेव उपाडे, के.के. भारसाकळे, गजानन वैरागड यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक राजेश उफाडे यांनी तर सुत्रसंचालन एस.एम. मोटे, सुरेश हिवाळे यांनी केले. आभार प्रदर्शन राजेश भिसे यांनी केले. यशस्वितेसाठी बी.एन. जाधव, विष्णू उफाडे, राजेश भिसे, पी.बी. सावळे, अमोल आगळे, प्रकाश उफाडे, राजेश शिंदे, रोहिदास नेटके, विद्यासागर वाघमारे, मारोती कदम, नामदेव राजपंखे, के.एम. वंजारे, माधव गाडे, गजानन घाटुळ, अशोक भारस्कळ, बाजीराव आवचार, व्ही. धोत्रे, गणेश उफाडे, मनोहर लांडगे, सुनिल लोंढे, रवी हातागळे, वाल्मिक वानखेडे, पी.एस. गणहिरे, चंद्रकांत आडबाल, पवन जाधव, राजेंद्र पाटोळे, आबासाहेब लोंढे, सचिन आगळे, जी. के. गवारे, सुनिल गुंडिले, संदीप वाघमारे आंिदनी परिश्रम घेतले.