नागपूर : लोकसभा निवडणूक जसजशा जवळ येत आहेत तसतसे भाजपने वेगाने राजकीय हालचाली सुरू केल्याचे दिसून येते. मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपने कंबर कसली असून राज्यातून 45 पेक्षा जास्त खासदार निवडणून आणण्याचं ध्येय ठेवलं आहे.
नागपुरात आज संघ परिवार आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सहा तास चर्चा झाली. त्यामध्ये विदर्भातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आल्याची माहिती आहे.
संघ आणि भाजप पदाधिका-यांची सुमारे सहा तास चाललेली विशेष बैठक संपली आहे. विदर्भातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा या बैठकीत घेण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. रविवारी पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला होता. आता विदर्भातील मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला आहे. त्या आधी राज्यभर महायुतीचे मेळावेही घेण्यात येत आहेत.