मुंबई : नवी मुंबईतील खार घर येथे आशियातील सर्वात दुसरे मोठ इस्कॉन मंदिर उभारले जात आहे. या मंदिराचा उद्घाटन सोहळा ९ जानेवारीपासून सुरु झाला असून तो १५ जानेवारीपर्यंत रंगणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी येत्या १५ जानेवारीला मुंबईत येणार आहेत. या मंदिराचे उभारणी नऊ एकरावर करण्यात आली आहे. संपूर्ण संगमरवरी पांढ-या शुभ्र दगडात हे बांधकाम करण्यात आले आहे. या मंदिराच्या सभागृहात भगवान श्रीकृष्णाच्या लीलांना थ्रीडी फोटोंच्या आधारे दाखविण्यात आले आहे.
या सोहळ्याला भजन सम्राट अनुप जलोटा, अभिनेत्री हेमामालिनी यांच्यासह अनेक माननीय पाहुणे उपस्थिती राहणार आहेत. सिडकोने या मंदिरासाठी जागा उपलब्ध केली होती. त्यानंतर अडीच एकर जागेवर हे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्सियसन्स ( इस्कॉन ) या भगवतगीतेचा प्रसार करणा-या संस्थेने या मंदिराची उभारणी केली आहे. नवीमुंबईतीर खारघर सेक्टर २३ मध्ये हे मंदिर उभारण्यात आले असून या मंदिराची उभारणी करण्याास १२ वर्षे लागले आहेत. या मंदिराच्या उभारणीसाठी पांढ-या शुभ्र आणि तपकीरी रंगाच्या संगमरवरी दगडांचा वापर केला गेलेला आहे. या एक आठवडाभर धार्मिक अनुष्ठान चालणार असून यज्ञ आणि इतर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची तयारी सुरु झाली आहे. भगवान श्रीकृष्ण यांना समर्पित या मंदिराचे नाव श्री श्री राधा मदन मोहन असे ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मंदिराचे येत्या १५ जानेवारीला उद्घाटन करणार आहेत. तसेच सांस्कृतिक सेंटर आणि वैदीक म्युझियमच्या कोनशिलेचे पूजन देखील करणार असल्याचे मंदिराचे ट्रस्टी आणि हेड डॉक्टर सूरदास प्रभू यांनी सांगितले.
जगभरात सुमारे ८०० इस्कॉन मंदिरे
दशावतार मंदिरातील अनेक दरवाजे किलोच्या चांदीपासून बनविले आहेत. दरवाजांवर गधा, शंख, चक्र आणि ध्वज सोनेरी प्रतिमा कोरण्यात आली आहे. या मंदिराची निर्मिती ग्लोरी ऑफ महाराष्ट्र योजनेअंतर्गत झाली आहे. इस्कॉन मंदिराचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांच्या तीन मूर्ती, भारत आणि परदेशातील त्यांच्या अनुयायांच्या मूर्ती, त्यांचे प्रतिमा आणि त्यांचे ग्रंथ असलेले एक स्मारक बांधण्यात आले आहे. जगभरात सुमारे ८०० इस्कॉन मंदिरे आहेत, परंतु नवी मुंबईतील हे एकमेव मंदिर असेल जिथे इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद जी यांचे स्मारक बांधण्यात आले आहे.