29.2 C
Latur
Saturday, November 16, 2024
Homeराष्ट्रीयवंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेचा वेग आणखी वाढणार

वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेचा वेग आणखी वाढणार

वर्षअखेर दोनशेपेक्षा जास्त ट्रेन सुरु होणार प्रवासाचा कालावधी कमी होणार

मुंबई : देशात लोकप्रिय ठरलेली वंदे भारत ट्रेनसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला असून वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग वाढविणार असल्याची माहिती मिळाली आहे.

वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग वाढणार असून मुंबई ते गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस सुसाट धावणार आहे. यामुळे या प्रवासाचा वेळ २५ ते ३० मिनिटे कमी होणार आहे. तसेच मुंबईवरुन आणखी एक वंदे भारत ट्रेन सुरु होण्याची शक्यता आहे. सध्या देशभरातून ८२ ठिकाणांवरुन वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाल्या आहेत. अनेक शहरांमधून या ट्रेन सुरु करण्याची मागणी होत आहे. या वर्षअखेर दोनशेपेक्षा जास्त ट्रेन सुरु होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वे पायाभूत सुविधा आणि अभियांत्रिकी सुधारणा करत आहे. त्या सुधारणांचा अंतिम टप्पा आला आहे. दरम्यान मिशन रफ्तारसाठी अंदाजे ३,९५९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या योजनेमुळे वंदे भारत, तेजस आणि शताब्दी एक्स्प्रेससारख्या रेल्वेगाड्यांचा प्रवास वेगवान होईल. पश्चिम रेल्वेच्या रुळाच्या दोन्ही बाजूने सुरक्षा भिंत उभारणेकिंवा लोखंडी तारा लावणे सुरू आहे. यामुळे रेल्वे रूळ ओलांडण्याच्या घटना, गुरे रेल्वे मार्गावर येण्याच्या घटना रोखता येतील.

काय होणार बदल?
मार्च २०२४ पासून मुंबई आणि गांधीनगर दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे. कारण पश्चिम रेल्वे पायाभूत सुविधा आणि अभियांत्रिकी सुधारणा करत आहे. त्या सुधारणांचा अंतिम टप्पा आला आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर ट्रेनला १६० किमी प्रतितास वेगाने धावण्याची परवानगी मिळणार आहे. सध्या ११० किमी वेगाने ही ट्रेन धावत आहे. परंतु लवकरच १६० किमी प्रतितास वेगाने वंदे भारत आणि शताब्दी ट्रेन धावणार आहे.

वेग वाढल्यानंतर ३० मिनिटे वाचणार
सध्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर वंदे भारत ट्रेनला जवळपास ५. १५ तास तर शताब्दी ट्रेनला ६.३५ तास लागतात. वेग वाढल्यानंतर ३० मिनिटे कमी होणार आहे. सध्या विरार आणि चर्चगेट दरम्यान वंदे भारत १००-११० किमीप्रति तास वेगाने धावते. या गाडीचा वेग १६० किमी वाढल्यानंतर ३० मिनिटे वाचणार आहे.

मुंबईतून आणखी एक वंदे भारत
सध्या महाराष्ट्रातून ७ रेल्वे मार्गांवर वंदे भारत सुरू करण्यात आली आहे. राज्यातील मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते जालना, मुंबई ते गांधीनगर (अहमदाबाद), नागपूर ते बिलासपुर, इंदूर ते नागपूर आणि मुंबई ते गोवा या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. आता दक्षिण कन्नडचे खासदार नलिन कुमार कटील यांनी रेल्वे मंर्त्यांकडे नवीन मागणी केली आहे. त्यानुसार, मंगळुरू सेंट्रल ते मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईपर्यंत नेण्याची विनंती केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही विनंती मान्य केल्यास मुंबईला आणखी एक वंदे भारत मिळणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR