22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात थंडीचा मुक्काम वाढणार

राज्यात थंडीचा मुक्काम वाढणार

पारा आणखी घसरण्याचा अंदाज

पुणे : राज्यात आणखी एक आठवडा थंडीचा मुक्काम असणार आहे. ८ फेब्रुवारी पर्यंत थंडीचा कडाका असणार असल्याचे अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येणा-या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्हा वळगता इतर राज्यात पहाटेचे किमान तापमान सरासरी १४ डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. त्यामुळे पुढील आठवड्यात पण शेकोटी, स्वेटर आणि इतर गोष्टी थंडी पासून वाचण्यासाठी आवश्यक असणार आहेत.

राज्यात पहाटेच्यावेळी थंडीचा कडाका वाढला असून दुपारी तापमान वाढत आहे. राज्यात मुंबई आणि कोकणात ७ जिल्हात किमान आणि कमाल तापमानाची नोंद होत आहे. पहाटे किमान १४ व दुपारी कमाल ३० डिग्री तापमानाची नोंद होत आहे. पुणे, नगर, खान देशातील जिल्हे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया अशा जिल्ह्यांमध्ये पहाटेचे किमान तापमान हे ८ ते १० डिग्री इतकं नोंदवलं गेले आहे. तर काही जिल्हात पारा १ ते २ डिग्री मध्ये घसरला आहे.

पुढील आठवड्यात थंडी आणखी वाढू शकते त्यामुळे हुडहुडी आणखी वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. थंड वा-यांचा हा प्रभाव ८ तारखेपर्यंत असणार आहे. बाहेरच्या देशातून येणारी थंडीच्या लाटेचे परिणाम जाणवतील असं सांगण्यात आलं आहे. साधारणपणे १५ फेब्रुवारीपर्यंत अशीच थंडी कायम असणार आहे. त्यामुळे सकाळच्या वेळात काहीसे ं ढगाळ वातावरण असणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR