24.1 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeउद्योगशेअर बाजार लाल रंगात बंद

शेअर बाजार लाल रंगात बंद

ऑटो, एफएमसीजीसह आयटीमधील शेअर्सने तारले

मुंबई : भारतीय शेअर बाजार मंगळवार दि. २४ डिसेंबर रोजी उच्चांकावर नफा बुक केल्यानंतर घसरणीसह बंद झाले. निफ्टी २५ अंकांनी घसरून २३,७२७ वर बंद झाला. तर सेन्सेक्स ६७ अंकांनी घसरुन ७८,४७२ वर बंद झाला. मासिक समाप्तीच्या दिवशी निफ्टी बँक ८४ अंकांनी घसरला आणि ५१,२३३ वर बंद झाला. एनएसईवर आज ऑटो, एफएमसीजी, आयटी, तेल आणि वायू, मीडिया या निर्देशांकांमध्ये वाढ झाली.

किंचित वाढीने शेअर बाजाराची आज सुरुवात झाली. पण, बाजार उघडल्याबरोबर सुस्ती यायला सुरुवात झाली. बेंचमार्क निर्देशांक पूर्णपणे सुस्त दिसले. सेन्सेक्स ७८,५५० च्या आसपास तर निफ्टी २३,७५० च्या वर दिसला. बँक निफ्टीही शांत होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही किंचित घसरले. आज एनएसईवर ऑटो, एफएमसीजी, आयटी, ऑइल अँड गॅस, मीडिया सारख्या निर्देशांकात तेजी दिसून आली. त्याचवेळी मेटल, रियल्टी, हेल्थकेअर, फार्मा यांसारख्या निर्देशांकांमध्ये सर्वाधिक घसरण झाली. टाटा मोटर्स, अदानी एंटरप्रायझेस, बीईएल, भारती एअरटेल, हीरो मोटोकॉर्प यांनी निफ्टीवर चांगला नफा नोंदवला. सिप्ला, जेएसडब्ल्यू स्टील, श्रीराम फायनान्स, टाटा कंझ्युमर, अल्ट्राटेक सिमेंट घसरले.

या आठवड्याची सुरुवात सकारात्मकतेने झाली होती, सोमवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून खरेदी झाली. ख्रिसमसपूर्वी डाऊ फ्युचर्स आणि निक्केई देखील सुस्त दिसून आले. कालच्या वाढीमध्ये, एफ२ने स्टॉक फ्युचर्समध्ये ६५०० कोटींहून अधिकची खरेदी केली. देशांतर्गत फंडांनीही २२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स खरेदी केले.

कालच्या कमकुवत सुरुवातीनंतर, यूएस बाजार सावरले आणि दिवसाच्या उच्च पातळीच्या जवळ बंद झाले. डाऊ ४०० अंकांच्या नेत्रदीपक वाढीसह जवळपास ७० अंकांनी वाढला तर नॅस्डॅकने २०० अंकांची उसळी घेतली. आज नाताळच्या निमित्ताने अमेरिकन बाजार अर्धा दिवस उघडला होता. तर उद्या सुटी असणार आहे.

टेलिकॉम कंपन्यांना ट्रायचा धक्का
टेलिकॉम कंपन्यांना ट्रायने धक्का दिला आहे. व्हॉईस कॉल आणि एसएमएससाठी स्पेशल टेरिफ व्हाउचर ठेवण्याच्या सूचना नियामकाने दिल्या आहेत. वैधता ९० ऐवजी ३६५ दिवस असेल. १० रुपयांचे रिचार्ज ठेवणे देखील आवश्यक असणार आहे. याशिवाय होंडा आणि निसानने विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू केली आहे. विलीनीकरणामुळे जगातील तिसरी सर्वात मोठी ऑटो कंपनी तयार होईल. जून २०२५ पर्यंत वाटाघाटी पूर्ण होतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR