22.2 C
Latur
Thursday, July 25, 2024
Homeलातूरनीट पेपरफुटी प्रकरणातील संशयीत आरोपीला आठ दिवसाची पोलिस कोठडी

नीट पेपरफुटी प्रकरणातील संशयीत आरोपीला आठ दिवसाची पोलिस कोठडी

लातूर : प्रतिनिधी
वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट-२०२४ परीक्षेतील उमेदवारांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या पैशाच्या मोबदल्यात अवैध मदत करण्याचे रॅकेट चालविणा-या ४ आरोपीं विरुद्ध दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) नांदेड युनिट यांचेकडून लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रविवारी रात्री उशिरा आरोपी नामे जलीलखाँ उमरखाँन पठाण यास अटक करण्यात आली होती. त्यास आज लातूर न्यायालयात पोलीसांनी हजर केले असता मा. न्यायालयाने त्यास आठ दिवसाची २ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
  या गुन्ह्यातील संशयित हे गैरव्यवहाराचे माध्यमातून पैसे घेऊन परीक्षा पास करून देण्याचे रॅकेट चालवीत आहेत अशी गुप्त माहिती एटीएस मधील अधिका-यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएसने यातील संशयित यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचे मोबाईल फोन मध्ये नीट -२०२४ परीक्षे संदर्भात संशयित माहिती मिळून आली आहे.
गुन्ह्याचे तपासात आरोपी नामे जलीलखाँ उमरखान पठाण यास रविवारी रात्रीच अटक करण्यात आली असून  तपास धिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर भागवत फुंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांनी त्यास आज सोमवार रोजी लातूर न्यालयात हजर करून तपासासाठी १० दिवसाची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली असता आठ दिवसाची २ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR