27.2 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeहिंगोलीभूकंपाच्या धक्क्याने वडगावच्या ऐतिहासिक किल्ल्याचा बुरुज ढासळला

भूकंपाच्या धक्क्याने वडगावच्या ऐतिहासिक किल्ल्याचा बुरुज ढासळला

हिंगोली : आज सकाळी तीव्र भूकंपाच्या धक्क्याने पेठ वडगाव येथील ऐतिहासिक किल्ल्याचा बुरुजला ढासळला. बुरुजाची मोठी पडझड झाली आहे. ऐतिहासिक किल्ल्याची भूकंपाच्या धक्क्याने हानी झाली. दरम्यान अद्याप प्रशासनाने याची दखल घेतली नाही.

गेल्या काही वर्षांपासून या भागातील २० ते २५ गावांना सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. प्रारंभी तर प्रशासनाने हा भूकंपच नाही तर भूगर्भातील हालचाली आहेत असे सांगत नागरिकांचे म्हणणे उडवून लावले. आता टप्प्याटप्प्याने भूकंपाची तीव्रता वाढत आहे आणि परीक्षेत्रही वाढले आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात आज सकली ७ वाजून १५ मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. रिश्टर स्केलवर ४.५ एवढी तीव्रता नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव, रामेश्वर तांडा ते वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या भागात आहे. या भूकंपाचे हादरे मराठवाड्यात जाणवले आहेत. दरम्यान, भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळ असलेल्या कळमनुरी तालुक्यातील पेठवडगाव येथील ऐतिहासिक किल्ल्याला याचा मोठा फटका बसला आहे. किल्ल्याचा बुरुज ढासळला असून मोठी पडझड झाली आहे.

या भागात मागील काही काळापासून सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. भूगर्भातून आवाज आला की लगेच नागरिक घराबाहेर पडतात. आजही भूकंपाचे हादरे जाणवताच सर्वंच लोक घराबाहेर आले. चर्चा करत असतानाच गावालगत असलेल्या ऐतिहासिक किल्ल्याकडून मोठा आवाज आला. मातीचे मोठे लॉट हवेत उठेल. काही वेळाने किल्ल्याचा बुरुजाचा काही भाग कोसळल्याचे निदर्शनास आले. ढासळलेल्या दगडांचा आवाज येताच धुळीचे लोट उठलेले दिसत होते. पेठ वडगावचा किल्ला अनेक अर्थाने ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण असल्याच्या नोंदी आहेत. आजच्या भूकंपाने त्या किल्ल्यालाही धक्का बसला आहे. या ऐतिहासिक किल्ल्याला गेलेले तडे आणि ढासळलेला बुरुज पाहताना वेदना होत असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR