नवी दिल्ली : इस्राईल-हमास युद्धाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा खुलासा केला आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात भारताने युद्ध थांबवण्याची विनंती केली होती. त्यासाठी भारतातून खास दूत पाठवण्यात आला, जेणेकरून युद्ध थांबवता येईल. इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारताची विनंती मान्य केली आणि युद्धबंदीला मान्यता दिली, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली.
मी माझा विशेष दूत इस्राईलला पाठवला आणि त्याला पंतप्रधान (बेंजामिन नेतन्याहू) यांना किमान रमजानच्या काळात गाझामध्ये बॉम्बस्फोट न करण्याविषयी सांगण्यास व समजावून सांगण्यास सांगितले. त्यांनी (इस्राईल) त्याचे पालन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. शेवटी, दोन-तीन दिवस भांडण झाले, इथे तुम्ही मुस्लिमांच्या मुद्यावरून मला कोंडीत पकडत आहात, पण मी त्याचा प्रचार केला नाही. अन्य काही (देशांनी) देखील प्रयत्न केले, आणि त्यांना देखील परिणाम मिळाले असतील. मी देखील प्रयत्न केला असे नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत सांगितले.
मुलाखतीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या विशेष दूतावीषयी बोलत होते ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल होते. डोवाल यांनी रमजानच्या आधी ११ मार्च रोजी इस्राईलला भेट दिली होती. त्यांनी इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतली आणि प्रादेशिक विकासावर चर्चा केली. तसेच गाझामधील लोकांच्या गरजांकडे लक्ष देण्यास सांगितले. त्या काळात गाझामध्ये अन्नपदार्थांची तीव्र टंचाई होती. इस्राईलच्या पंतप्रधानांनी ही माहिती दिली होती.
बैठकीत डोवाल यांनी ओलीसांची सुटका आणि मानवतावादी मदतीबाबत चर्चा केली. ऑक्टोबरमध्ये हमासने इस्राईलवर हल्ला करून १२०० लोकांना ठार केले होते. त्यांनी २५० इस्राईली लोकांनाही ओलीस ठेवले होते. डोवाल यांनी इस्त्राईली समकक्ष तजाखी हानेग्बी यांचीही भेट घेतली.