22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रविजयी उमेदवार सत्ताधा-यांच्या निशाण्यावर

विजयी उमेदवार सत्ताधा-यांच्या निशाण्यावर

मुंबई : राज्यात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला अधिक यश मिळाल्याने महायुतीच्या किंबहुना भारतीय जनता पक्ष(भाजप)च्या जिव्हारी लागले आहे. अशातच बीडच्या बजरंग सोनवणे यांच्या विजयावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून परभणीचे संजय जाधवही फडणविसांच्या निशाण्यावर असल्याचे शनिवार दि. ८ जून रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीतून दिसून आले आहे.

आज मुंबईमध्ये भाजपच्या प्रमुख नेते आणि पदाधिका-यांचा मेळावा पार पडला. यामध्ये फडवणीसांनी भाजपच्या पराभवाची कारणे सांगताना पक्षाविरोधात खोट्या अफवा पसरवल्यामुळे फटका बसल्याचे म्हणाले. यावेळी त्यांनी स्पष्टीकरण देताना परभणीचे खासदार बंडू जाधव आणि बीडचे नवनिर्वाचित खासदार यांच्या एका विधानाचा दाखला देत, विरोधकांचा विजय कशामुळे झाला हे सांगितले. बीड जिल्ह्यात अजूनही सोशल मीडियावर जातीवाचक व विविध नेत्यांची अवहेलना करणा-या पोस्ट केल्या जात असून याद्वारे सामाजिक सलोखा बिघडून आपसातील द्वेष व तणाव वाढत आहे. त्यामुळे आपला सामाजिक सलोखा व सौहार्द जपण्याची जबाबदारी आता प्रत्येक बीड जिल्हावासीयांची आहे असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.

सोशल मीडियावर अजूनही आमच्यासारख्या नेत्यांचे फोटो आणि बनावट व्हिडीओ पोस्ट करून वातावरण दूषित केले जात आहे अत्यंत खालच्या भाषेत राजकीय नेत्यांवर टीका करणा-या पोस्ट तसेच जाती-जातीत तेढ निर्माण करणा-या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. महायुती व महाविकास आघाडीच्या दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, की हे आता थांबले पाहिजे असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने नियमानुसार मतमोजणी प्रक्रियेत किंवा मतमोजणी केंद्राच्या जवळपास सुद्धा उपस्थित नसताना मी बंदूक काढली किंवा कोणाला मारहाण केली अशा पद्धतीच्या खोट्या पोस्ट जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत. या गोष्टीत अजिबात तथ्य नसून या गोष्टी पूर्णपणे खोटारड्या व जाणीवपूर्वक बदनामी करणा-या आहेत. अशा गोष्टी पेरल्याने काय साध्य होणार आहे असा प्रश्नही मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

पराभव दोघांच्याही जिव्हारी : धनंजय मुंडे
‘क्या हार मे, क्या जीत में, किंचित नही भयभीत मै… स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या या कवितेप्रमाणे मी व पंकजाताईंनी अत्यंत जिव्हारी लागणारा हा पराभव मान्य केला आहे. लोकशाहीमध्ये जनतेचा कौल हा महत्त्वाचा असतो आणि तो कौल आपण मान्य करून विजयी उमेदवारास शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. असे वक्तव्य बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शनिवारी बीड येथे केले आहे.

बीड, परभणी आणि धुळयात मुस्लिम मते आघाडीला
देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या ११ जागा १, २ किंवा ३ टक्क्यांपेक्षा कमी मताने पडल्या आहेत. त्यासाठी त्यांनी धुळे मतदार संघाचे उदाहरण दिले आणि म्हणाले, परभणीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणीचे खासदार स्पष्टपणे म्हणत आहेत की, मराठा समाजापेक्षा त्यांना मुस्लिम समाजाने जास्त मते दिली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR