22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्र..तर आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार

..तर आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार

ठाणे : एमएसआरडीसीचे सह-संचालक अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा अश्वजीत गायकवाड याने त्याच्या मित्रांच्या मदतीने प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. अश्वजीत गायकवाड हा विवाहित असल्याचेही समोर आल्यानंतर त्याने हे कृत्य केले. या प्रकरणात सदर युवती ही गंभीर जखमी झाली. आता याबाबत पीडितेच्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्या म्हणाल्या की, चार दिवस झाले पण आजतागायत या प्रकरणात कोणतीही कठोर कारवाई झाली नाही. या प्रकरणी आयपीसीएचे कलम ३०७, ३५६ अंतर्गत स्टेटमेंट घेतले पाहिजे परंतु ते घेतले गेले नाही. त्यांनी तसे केले नाही तर आम्ही माननीय उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.

प्रिया सिंगच्या वकील दर्शना पवार यांनी शनिवारी या प्रकरणी प्रसारमाध्यमांना सांगितले की, प्रिया सिंगला खूप गंभीर दुखापत झाली आहे. तिच्या प्रियकराने तिला पळवून लावले. ती पुढील तीन महिने तरी चालू शकणार नाही. आयपीसीएच्या कलम ३०७, ३५६ अंतर्गत स्टेटमेंट घेतले पाहिजे परंतु ते घेतले गेले नाही. याबाबत आम्ही तपासी अधिका-यांना विचारणा करत आहोत.

या प्रकरणाची माहिती देताना ठाणे पोलिसांचे डीसीपी अमरसिंह अमरसिंग जाधव म्हणाले की, पहाटे चार वाजता हॉटेल कोर्टयार्डसमोर विश्वजीत गायकवाड, रोमिल पाटील आणि सागर शेळके यांच्यात पीडितेसोबत भांडण झाले. त्यानंतर पीडितेला मारहाण झाली. पोलिसांनी पीडितेचे जवाब नोंदविले असून त्यानुसार भादंविच्या कलम २७९, ३३८, ५०४ आणि ३२३ नुसार गुन्हा नोंदवून कारवाई सुरू करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर प्रभाव टाकणारी प्रिया सिंगने आरोप केला आहे की, तिच्या प्रियकराने तिला कारने चिरडले आणि तिला रस्त्यावर मरण्यासाठी सोडले. प्रिया सिंहने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये ही माहिती दिली.
इंस्टाग्रामवर प्रिया सिंगचे ११ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. प्रिया सिंहने सांगितले की, माझ्या प्रियकराशी साडेचार वर्षांपासून संबंध होते. आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात होतो. त्याचे लग्न झाले होते, मला हे आधी माहित नव्हते. जेव्हा मला त्याच्या पत्नीबद्दल कळाले, तेंव्हा तो म्हणाला की मी तिला घटस्फोट दिला आहे आणि आता मला फक्त तुझ्यासोबत राहायचे आहे.

पापाची शिक्षा नक्कीच मिळेल
महाराष्ट्र सरकारचे वने आणि सांस्कृतिक राज्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी सांगितले की, “मग तो अधिकार्‍याचा मुलगा असो वा मोठा नेता, त्याला संविधानाच्या बळावर बनवलेल्या कायद्याचा चटका सहन करावा लागेल. त्याची इच्छा असो वा नसो. ती व्यक्ती कोणीही असो, त्याने हे पाप केले असेल, तर त्याला त्याच्या पापाची शिक्षा नक्कीच मिळेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR