21.3 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeपरभणीराजकारणात नितीमत्ता उरली नाही : प्रा. मनोहर धोंडे

राजकारणात नितीमत्ता उरली नाही : प्रा. मनोहर धोंडे

परभणी : आज राजकारणात नितिमत्ता उरली नाही. त्याच्या शुध्दीकरणासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे अठरापगड जातींना सोबत घेवून सेवा जनशक्ती पार्टीचे काम आपल्याला एक मास्टर प्लॅन घेऊन पुढे न्यायचे आहे असे प्रतिपादन शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आणि सेवा जनशक्ती पक्षाचे प्रमुख प्रा. मनोहर धोंडे यांनी केले.

वीरशैव लिंगायत समाजाच्या न्यायहक्कासाठी कार्यरत असणा-या शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचा २८वा आणि सेवा जनशक्ती पार्टीचा १ला वर्धापन सोहळा रविवार, दि. २८ जानेवारी रोजी परभणी शहरात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील मैदानात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. धोंडे बोलत होते. या वर्धापन दिनाचे उद्घाटन डॉ. वाय. बी. सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत शेटे, राष्ट्रीय उपाध्यक्ष अभयराव कल्लावार, राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवशरणअण्णा बिराजदार, राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊ खंकरे, राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर, जिल्हाध्यक्ष रामेश्वर कुबडे, भाजपचे परभणी विधानसभा प्रमुख आनंद भरोसे, मनपाचे माजी सभापती सचिन देशमुख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना प्रा. धोंडे यांनी सांगितले की, अहमदपूर येथे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या समाधीवर ंिलग स्थापना दि. २५ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. हा सोहळा अभुतपूर्व होणार असून जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रामदास आठवले हे उपस्थित राहणार असून राष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांना आमंत्रित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. समाजाच्या संरक्षण व आरक्षणासाठी ही संघटना कटिबध्द असून यापुढेही जोमाने काम करणार असल्याचे प्रा. धोंडे यांनी सांगितले. प्रास्ताविक राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर यांनी केले. सूत्रसंचालन संभाजी शेवटे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार
शिवा संघटनेने वर्धापन दिनानिमित्त परभणी शहरात रस्त्यालगतच्या खांबांवर लावलेले भगवे झेंडे आणि क्रांतिसुर्य महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा असलेले बॅनर्स काढून कच-याच्या गाडीत टाकण्याचा निंदणीय प्रकार रविवार, दि.२८ जानेवारी रोजी परभणीत घडला आहे. या प्रकरणी आपण लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंर्त्यांची भेट घेवून तक्रार करणार असल्याचे शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आणि सेवा जनशक्ती पक्षाचे प्रमुख प्रा. मनोहर धोंडे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR