20.7 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसची तिसरी यादी जाहीर

काँग्रेसची तिसरी यादी जाहीर

मुंबई : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. शनिवार दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळीच काँग्रेसची दुसरी यादी जाहीर केली होती.

त्यानंतर शनिवारी संध्याकाळी तिसरी यादी देखील काँग्रेसने जाहीर केली आहे. या तिस-या यादीमध्ये १६ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. आत्तापर्यंत काँग्रेसने ८७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

१६ उमेदवारांची यादी
खामगाव : राणा दिलीपकुमार सानंदा
मेळघाट : डॉ. हेमंत चिमोटे
गडचिरोली : मनोहर तुळशीराम पोरेटी
दिग्रस : माणिकराव ठाकरे
नांदेड दक्षिण : मोहनराव हंबर्डे
देगलूर : निवृत्तीराव कांबळे
मुखेड : हणमंतराव पाटील बेटमोगरेकर
मालेगाव मध्य : एजाज बेग
चांदवड : शिरीषकुमार कोटवाल
इगतपूरी : लकीभाऊ जाधव
भिवंडी पश्चिम : दयानंद चोरगे
अंधेरी पश्चिम : सचिन सावंत
वांद्रे पश्चिम : आसिफ झकारीया
तुळजापूर : धीरज पाटील
कोल्हापूर उत्तर : राजेश लाटकर
सांगली : पृथ्वीराज पाटील

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR