22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरभीषण अपघातात तेरा कामगार जखमी

भीषण अपघातात तेरा कामगार जखमी

पंढरपूर: खताच्या कंपनीमध्ये कामाला असलेल्या मजुरांना घेऊन जाणारा पिक अप हे वाहन पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात तेरा कामगार जखमी झाली असून त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली. जखमींना तातडीने 108 क्रमांक ॲम्बुलन्स मध्ये घालून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आले.

जिरमल वेला ठाकूर, सुरंगी जिरमल ठाकूर, शिवानी वेला ठाकूर, राकेश आरिया, रविदास आरिया, शिवम जिरमल ठाकूर, सुरमा रविदास आरीया, आशिक रविदास आरिया, आदेश रविदास आरिया, कस्त्री सोलंकी, आस्मिन ब्राह्मणे, दिपाली आरिया, शिवलाल सोलंकी हे तेरा जण जखमी झाले असून त्यापैकी साधनांची प्रकृती गंभीर आहे. एम एच 13 सी यू 9461 हे पीक अप वाहन आज सोमवारी सकाळी खाजगी खताच्या कंपनीकडे या कामगारांना घेऊन जात होते, भोसे पाटील जवळ दिवाण मळा या ठिकाणी हा पीक अप पलटी झाला आणि हा अपघात झाला.

अपघाताची माहिती पंढरपूर पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने १०८ क्रमांक ॲम्बुलन्स ला फोन लावला. त्यावेळी पंढरपूर रऊऌ लोकेशन, करकंब लोकेशन आणि विठ्ठल मंदिर लोकेशन या ठिकाणच्या ॲम्बुलन्सचे डॉक्टर आदिल गुजर, पायलट नागेश नरळे, डॉक्टर वैभव भिंगारे, पायलट अतुल माळी, डॉक्टर गौरी देठे, पायलट लघु चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले. तातडीने जखमींना पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाकडे नेण्यात आले त्यापैकी अति गंभीर जखमी असलेल्या सहा जणांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मदत कार्यात पोलीस उपनिरीक्षक नितेश गायकवाड, पोलीस हवालदार राजकर, गोरे, भोसले, पोलीस नाईक गव्हाणे, लेंगरे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR