पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणाला वेग आला आहे. लवकरच सर्व पक्षांचा प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७ ते ८ सभा घ्याव्या लागतात हा महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेचा विजय आहे, असा टोला शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला लगावला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकूण ८ प्रचार सभा घेणार आहेत. त्याखालोखाल देशाचे गृहमंत्री अमित शहा हे २० प्रचार सभांना हजेरी लावणार आहेत. यावरून सुळे यांनी, हा महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेचा विजय आहे, असा टोला लगावला.
केंद्रात २०१४ पासून मंत्री असलेला मराठमोळा चेहरा नितीन गडकरी हे संपूर्ण राज्यात एकूण ४० सभा घेणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वाधिक ५० प्रचार सभा, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ४० प्रचार सभा घेणार आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील तब्बल १५ प्रचारसभांना संबोधित करतील अशी माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७ ते ८ सभा घ्याव्या लागतात तसेच अजित पवार यांनी दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्याबाबत केलेल्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. आर. आर. आबा हे इमानदार होते. अजित पवारांची फायनल चौकशी ही देवेंद्र फडणवीस यांनीच लावली. गेल्या चार-पाच दिवसांत ज्या घटना घडत आहेत, त्याचे मूळ देवेंद्र फडणवीस आहेत, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला.
आमच्यावर चांगले संस्कार
दरम्यान, पहिला आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहास्तव चौकशी केली. गेलेल्या माणसाबद्दल बोलणे योग्य नाही. आमच्यावर चांगले संस्कार आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.