नांदेड : वाडीचा पाणीपुरवठा पैशामुळे नाही तर पंपिंग स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बंद आहे. शहराचा पाणीपुरवठा अद्याप पूर्वपदावर आला नाही. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तयार करण्याचे काम सुरू असून त्यानुसार पुढील काळात पाणीपुरवठा होईल. सद्यस्थितीत असर्जन येथील दोन पंपांच्या दुरुस्तीचे काम अद्यापही सुरू आहे.
विविध कार्यालयांची मनपाकडे थकबाकी आहे. तर वाडीसारख्या ग्रामपंचायतीकडे मनपाची साडेचार कोटींची थकबाकी आहे. या थकबाकीचे हप्ते पाडून देण्याची मनपाची तयारी आहे. महावितरणचे बिलही मनपा दर महिन्याला भरावे लागते. त्यासोबत शहराला पाणीपुरवठा करणे हे आमचे कर्तव्य आहे. हे आर्थिक गणित जुळवताना मनपाला कसरत करावी लागत आहे. अशा स्थितीत सवलतीच्या दरात शहराबाहेर पाणीपुरवठा करणे हे शहरवासींयावर अन्याय होईल, अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी व्यक्त केली.