27.6 C
Latur
Monday, April 22, 2024
Homeसोलापूरसोरेगावच्या मंदिरात हजारो भाविकांनी घेतले शेगावीच्या राणाचे दर्शन

सोरेगावच्या मंदिरात हजारो भाविकांनी घेतले शेगावीच्या राणाचे दर्शन

सोलापूर : शेगावीचा राणा श्री गजानन महाराज यांच्या १४६व्या प्रकट दिनानिमित्त शहरालगत असलेल्या सुरेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरामध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी डॉ.गुरुनाथ परळे मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाखरे ,विजयकुमार रघोजी, गुरुलिंग कन्नूरकर यांच्या हस्ते स्त्रीची महाआरती करण्यात आली यावेळी पंधरा हजार भक्तगण उपस्थित होते.

श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोते अशा जयघोषत श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. प्रकट दिनाच्या निमित्ताने दररोज सकाळी रुद्र पूजा, दहा ते बारा यावेळेत सामूहिक श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण संजीवनी नलावडे, सुरेखा चोरमले, मैथिली भोसले यांनी केले. श्री गजानन महाराज यांंच्या प्रकट दिनानिमित्तश्री गजानन महाराज (शे) सांस्कृतिक मंडळ सोलापूरच्या वतीने तीन दिवसा पासून विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

दररोज सकाळी अभिषेक, श्री गजानन विजय ग्रंथाचे सामुहिक वाचन. दुपारी १ते५ या वेळात मार्कंडेय, विणाप्रसाद, श्रावणी, द्वारकाधीश ,चौपाड विठ्ठल, स्वरा व राजस्व महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन सेवा बजावण्यात येत होती . तीन मार्च रोजी सकाळी नितीश पाखरे व संदीप कन्नूरकर यांच्या हस्ते रुद्र पूजा , श्री ंच्या मूर्तीस महाअभिषेक करण्यात आला. दहा ते अकरा वाजेपर्यंत उर्वरित श्री गजानन विजय पारायण संपन्न झाले होते . सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत रक्तदान शिबिर व उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रांगांची व्यवस्था करण्यात आली होती मंदिराच्या सभामंडपा बाहेरून भाविकांची रांग रस्त्यापर्यंत गेली होती.

सांयकाळी ५-३० वाजता श्रींच्या पालखी ची मंदिराभोवती मिरवणूक काढण्यात आली. या प्रकटदिनाच्यख सोहळ्यसाठी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाखरे, उपाध्यक्ष विजयकुमार रघोजी, कार्यवाह गुरुलिंग कन्नूरकर, सुहास गुडपल्ली,नारायण जोशी,तुकाराम जाधव,आनंद जाधव, संस्कार कन्नूरकर, वेदांत कन्नूरकर, शामकुमार कांबळे, ए.जी.पाटील तंत्र निकेतनचे राष्ट्रीय सेवा योजनेचे २५व संत गजानन परीवारचे ५० स्वयंसेवक यांनी विषेश परिश्रम घेतले. दमाणी रक्त संकलन केंद्रा मार्फत रक्त दान शिबिराचे आयोजन केले होते.रक्त दान शिबिरास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये ६५रक्तदात्यांनी रक्तदान केले. संस्कृतीक कार्यक्रमात सोलापुरातील गायिका संध्या जोशी, जितेंद्र अभिषेकीचे शिष्य दीपक कलढोने यांच्या गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला . गायन कार्यक्रमास रसिकांनी भरभरून साद दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR