नवी दिल्ली : फौजदारी कायद्यांशी संबंधित तीन विधेयके लोकसभेत मंजूर झाली आहेत. याआधी या विधेयकांवर चर्चा झाली. नवीन कायद्यात दहशतवाद, महिलांवरील गुन्हे, देशद्रोह आणि मॉब लिंचिंगशी संबंधित नवीन तरतुदी आणण्यात आल्या आहेत. १४३ खासदार निलंबित असताना ही विधेयके मंजूर करण्यात आली आहेत. अमित शाह म्हणाले की, नवीन कायद्यांमध्ये महिला आणि मुलांवर परिणाम करणाऱ्या कायद्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. मोदी सरकार पहिल्यांदाच दहशतवादाची व्याख्या करणार आहे, राजद्रोहाचे देशद्रोहात रूपांतर केले जात आहे, असे शहा यांनी म्हटले.