पूर्णा/प्रतिनिधी
चुडावा शिवारात नांदेड- पूर्णा राज्य रस्त्यावरील दुचाकी व ट्रॅक्टर अपघातात आईसह चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना दि. ११ जानेवारी रोजी रात्री घडली. याशिवाय दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याची घटना पांगरा- पूर्णा रोडवरील तरंगल शिवारात रविवार, दि.१२ जानेवारी रोजी घडली. यात एका ३९ वर्षीय ईसमाचा जागीच मृत्यू झाला आहे.
पूर्णा तालुक्यातील चुडावा येथील महिलेला तिचा भाऊ हिरो कंपनीच्या मोटरसायकल क्रमांक एम एच २२ बीबी ८०४८ गाडीवरून कलमुला या गावी तिच्या सासरी दोन मुलीसह नेऊन सोडत असताना ट्रॅक्टर क्रमांक एम एच २६ बीक्यू ३७६६ ने दिलल्या धडकेत दुचाकीवरील स्वाती बालाजी लेडंगे (वय २५) व त्यांची अंदाजे ४ ते ५ वर्षाची मुलगी या दोघींचा मृत्यू झाला. या अपघातात दोन ते तीन वर्षाची एक मुलगी व भाऊ रितेश ज्ञानेश्वर देसाई (वय १८) याच्या पायाला व हाताला मार लागून गंभीर जखमी झाला आहे. नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत महिला व तिच्या चिमुकलीवर सासरी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने चुडावा कलमुला गावात शोककळा पसरली आहे.
दुस-या घटनेत अर्जुन दशरथ ढोणे रा. पांगरा ढोणे रविवारी मोटारसायकल क्रमांक एम एच २२ एल ५३२५ वरुन पांगरा गावाकडून पूर्णाकडे अखाड्यावर जात होता. दरम्यान पांगरा पूर्णा रोडवर असलेल्या रमाकांत ढोणे यांच्या शेताजवळ येताच पूर्णेकडून पांगरा गावाच्या दिशेने पांगरा येथीलच कृष्णा गोविंद चव्हाण मोटारसायकल क्रमांक एम. एच २२ ए वाय ६३६१ वरुन तीघे जात जात असताना समोरुन येणा-या अर्जुनच्या दुचाकीला जोरदार टक्कर दिली. या भिषण अपघातात अर्जुन ढोणे गंभीर जखमी झाले. अर्जुन ढोणे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चुडावा पोलीस कर्मचारी मुंडे, काकडे हे घटनास्थळी दाखल होवून त्यांनी पंचनामा केला. पुढील तपास सपोनि नरसिंग पोमनाळकर करत आहेत.