23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeसोलापूरपत्नीस पेटवून देऊन खून केल्याप्रकरणी पतीसह तिघे निर्दोष

पत्नीस पेटवून देऊन खून केल्याप्रकरणी पतीसह तिघे निर्दोष

सोलापूर : पूनम किरण गुळवे वय-22 हिचा पेटवून देऊन खून केल्याप्रकरणी पती किरण दीनानाथ गुळवे वय 22, सासरा दीनानाथ रामचंद्र गुळवे वय 53, सासु कलावती दीनानाथ गुळवे वय:- 45, सर्व रा:- निराळे वस्ती, मुरारजी पेठ,सोलापूर यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश के.डी.शिरभाते यांच्यासमोर होऊन गुन्हा सिध्द न झाल्याने त्यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

यात हकीकत अशी की, यातील मयत पूनम हिचे लग्न आरोपी किरण याच्यासोबत दि:-19/5/2014 रोजी झाले होते. लग्नानंतर पुनम ही नांदण्यास आल्यावर तिचा पती किरण, सासरा दीनानाथ व सासू कलावती हे तिला लग्नात तुझ्या आई-वडिलांनी मानपान केला नाही, तसेच तिस कॉलेजला जाण्यासाठी गाडी घेण्याकरता माहेरहून 50000 रुपये घेऊन ये म्हणून सतत त्रास देत होते व तिस तू पांढऱ्या पायाची आहे, असे म्हणून कायम जाचहाट करीत होते, दि:-26/8/2014 रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास मयत पूनम व तिचा नवरा किरण यांच्यात भांडण चालू असताना सासरा दीनानाथ व तिचा पती किरण यांनी मयत पूनम हिचे हात धरले व सासू कलावती हिने तिचे अंगावर रॉकेल ओतून काडेपेटीने पेटवून देऊन जाळून जीवे ठार मारले, त्यावर तिस उपचारार्थ सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता, वरील आशयाची हकीकत तिने बहिणीसमोर सांगितली होती.

उपचारादरम्यान दि:-27/8/2014 रोजी ती मयत झाली, त्यावर पुनम हिचे वडील अशोक पांडुरंग मोटे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी करून आरोपीविरुद्ध दोषारोप पत्रक दाखल केले होते. सदर खटल्यात एकंदर नऊ साक्षीदार तपासण्यात आले.खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपींचे वकील ॲड मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवादात मयत पूनम ही बोलण्याच्या स्थितीत होती तर तिचा न्यायदंडाधिकारी यांचे समोर जबाब का घेतला नाही यावरून तिने बहिणी पुढे जबाब दिला हे विश्वासार्ह वाटत नाही असा युक्तीवाद मांडला, त्यावरून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यात आरोपीतर्फे ऍड मिलिंद थोबडे,ऍड विनोद सूर्यवंशी, ऍड दत्ता गुंड तर सरकारतर्फे ऍड प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR