22 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपसोबत सत्ता स्थापण्यासाठी बैठक झाली होती : शरद पवार

भाजपसोबत सत्ता स्थापण्यासाठी बैठक झाली होती : शरद पवार

मुंबई : प्रतिनिधी
अजित पवार यांनी दावा केला होता की, विधानसभा निवडणूक २०१९ नंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सत्ता स्थापनेसाठी दिल्लीत बैठक झाली होती. त्यावेळी शरद पवार, अमित शाह यांच्यासह दोन्ही पक्षातील बडे नेते सामील झाले होते. शरद पवार यांनी देखील अशी बैठक झाल्याचे आता मान्य केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार सातत्याने म्हणत आहेत की, शरद पवारांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी भाजपला पाठिंबा दिला आणि ऐनवेळी माघार घेतली. मात्र याबाबत शरद पवारांनी कधीही स्पष्टपणे काही गोष्टी बोलून दाखवल्या नव्हत्या. मात्र पहिल्यांदाच शरद पवारांनी सत्तास्थापनेबाबत अमित शाह आणि भाजप नेत्यांसोबत बैठक झाल्याचे मान्य केले आहे.

शरद पवार यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या आधी दिल्लीत ही बैठक झाली होती. भाजपसोबत जाण्यास माझा विरोध होता. पक्षातील नेत्यांकडून सातत्याने होणारी मागणी लक्षात घेऊन मी बैठकीला होकार दिला.

स्थिर सरकारसाठी रणनिती
दिल्लीत भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची सत्तास्थापनेसाठी बैठक झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी देखील मान्य केले आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आपण एकत्र येणार आहोत, असे शरद पवारांनी ठरवले होते. राज्यात १० नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन झाले नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होणार होती. मात्र राष्ट्रपती राजवट लागू देत, अशी रणनीती ठरली होती. भाजपविरोधात लढलो तरी स्थिर सरकार देण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपने मिळून एकत्र सरकार स्थापन करण्याचे ठरले, असे शरद पवार जाहीर करणार होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR