राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर, ३० जूनला कोल्हापुरात वितरण
कोल्हापूर : प्रतिनिधी
सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात संपूर्ण देशपातळीवर कार्यरत असलेल्या आविष्कार फाऊंडेशन, इंडिया या संस्थेचे लोकराजा राजर्षी शाहू गौरव राज्य व राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली. माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे, एकमतचे संपादक मंगेश देशपांडे-डोंग्रजकर, श्रीरामपूरचे प्रा. डॉ. मारुती केकाणे, पुणे येथील प्रा. डॉ. किशोर नवले, रामानंदनगर येथील प्रा. दिनेश ससाणे, सोलापूर येथील डॉ. अनिल कांबळे, पाटणच्या सौ. वैशाली पवार यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून, रविवार, दि. ३० जून २०२४ रोजी सकाळी ११ वाजता कोल्हापुरात या पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती आविष्कार फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इस्रोचे सेवानिवृत्त अभियंता नगिनभाई प्रजापती, रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे अध्यक्ष डॉ. एम. बी. शेख, पुणे येथील नेस वाडिया कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. प्रकाश चौधरी, शाहू स्मारकचे प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते उमेश पाटील बागणी, आंतरराष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक विजय पवार, सोलापूर जिल्हा महिला संघटक स्नेहल खंकाळ, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष दत्तात्रय सुर्यवंशी, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रंगराव सुर्यवंशी, पवनकुमार पवार, सौ. प्रतिमा पवार, कु. सेजल पवार उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी ख्यातनाम साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे असणार आहेत.
शाहू महाराज यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन कार्यरत राहिलेल्या महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणा-या मान्यवरांना राज्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रघूनाथ पाटील, सौ. अलका ढवळे, फिरोज तडवी, सौ. अर्चना कोल्हे, ज्योती जाधव, आरिफ तडवी, लातूरच्या माजी महापौर स्मिता खानापुरे, मनोहर कांबळे, जया पाटील, गंगाधर पाटील, विवेक गुरव, डॉ. गणपती पाटील, डॉ. स्रेहल पाटील, सत्यविजय भोसले, कमलेश राक्षे, ललित पाटील, सुनिलकुमार राठी, सचिन हागे, मनिषा पाटील, फारूकी सदरूद्दीन, अभिजित जाधव, संतोष तळवणेकर, आकाश पारकर, पूनम कंक, संतोष निकम, प्रदीप वीर, सौ. भारती पाटील, प्रवीण येडगे, सूर्यकांत दिंडे, गणेश बुरूड, लक्ष्मीकांत बिन्हाडे, अरविंद पवार, सखाराम कांबळे, रमेश ढवळे, अरविंद गावित, चंद्रशेखर जैन, शंकर भोला, शिवाजी कणसे, प्रतिभा खिलारे, वैशाली साळुंखे, अकबर तडवी, निवृत्ती पाटील, रूपेश बांदेकर, सागर फाळके, प्रदीप सावंत, रविंद्र पाटील, भरत शिरसाठ, धीरज जाधव, प्रा. नम्रता कांबळे, पैलवान विक्रांत डोंगरे, अमोल घोडके, राहुल शिंदे, हर्षाला चौधरी, रामदास फुसे, किरणकुमार पाटील, प्रा. भाग्यश्री कुंभार, बाबासाहेब सावगावे यांच्यासह श्री जोतिर्लिंग देव संस्था पाडळी जि. सातारा यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्कार वितरण सोहळ््यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.