22.8 C
Latur
Monday, July 22, 2024
Homeपरभणीपरभणी जिल्ह्यातील पाच पोलिस अधिका-यांच्या बदल्या

परभणी जिल्ह्यातील पाच पोलिस अधिका-यांच्या बदल्या

परभणी : परभणी जिल्ह्यातील ५ पोलिस अधिका-यांच्या विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाने नांदेड जिल्ह्यात बदल्या केल्या आहेत. यात सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष सानप, बालाजी गायकवाड, सरला गाडेकर व विकास कोकाडे यांची तसेच पोलिस उपनिरीक्षक राधिका भावसार यांचीही नांदेडला बदली करण्यात आली आहे.

या रिक्त जागांवर नांदेड येथून सहाय्यक पोलिस निरीक्षक आदित्या लोणीकर, सुशांत किणगे, विजय जाधव, विनोद चव्हाण व हिंगोली येथून सुनील गोपीनवार, राजेश मलपिल्लू हे परभणी जिल्ह्यात रूजू होणार आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांच्या स्वाक्षरीने सहाय्यक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश निघाले आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR