28 C
Latur
Wednesday, September 25, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील आयपीएस अधिका-यांच्या बदल्या

राज्यातील आयपीएस अधिका-यांच्या बदल्या

मुंबई : राज्यातील आयपीएस अधिका-यांच्याा बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. त्याचसोबत ११ अप्पर पोलिस अधिका-यांच्याा बदल्याही करण्यात आल्या आहेत. सातारचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांची बदली मुंबई पोलिस उपायुक्तपदी झाली आहे. तर अतुल कुलकर्णी यांची बदली सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी करण्यात आली आहे.

शासन आदेश, गृह विभाग, क्र. आयपीएस-२०२४/प्र.क्र.८८/पोल-१, दिनांक ०७.०८.२०२४ द्वारे, श्रीम. प्रियंका नारनवरे, भा.पो.से., समादेशक, रा. रा. पोलीस बल गट क्र. ४, नागपूर यांची “पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर” या पदावर बदलीने करण्यात आलेली पदस्थापना, याद्वारे, रद्द करण्यात येत आहे. त्या अनुसार, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांनी कायदा व सुव्यवस्था, निवडणुकीची आदर्श आचारसंहिता, इत्यादी लक्षात घेऊन पुढील उचित कार्यवाही करावी.
हा शासन आदेश, महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) याच्या कलम २२न (२) मधील परंतुकानुसार, सर्वोच्च सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.

उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०८१३१८२०५६७३२९ असा आहे. हा शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.

बदल्या करण्यात आलेल्या अधिक-यांची यादी
अतुल कुलकर्णी – पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
श्रीकृष्ण कोकाटे – पोलिस अधीक्षक, ंिहगोली
सुधाकर बी. पठारे – पोलिस अधीक्षक, सातारा
अनुराग जैन – पोलिस अधीक्षक, वर्धा
विश्व पानसरे – पोलिस अधीक्षक, बुलढाणा
शिरीष सरदेशपांडे – पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे
संजय वाय. जाधव – पोलिस अधीक्षक, धाराशीव
कुमार चिता – पोलिस अधीक्षक, यवतमाळ
आंचल दलाल – समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट क्र.१, पुणे
नंदकुमार ठाकूर – प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, दौंड
निलेश तांबे – प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर
पवन बनसोड – पोलिस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती
नुरुल हसन – समादेशक, राज्य राखीव पोलिस बल गट क्र.11, नवी मुंबई
समीर अस्लम शेख – पोलिस उप आयुक्त, मुंबई शहर
अमोल तांबे – पोलिस अधीक्षक/दक्षता अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे
मनिष कलवानिया – पोलिस उप आयुक्त, मुंबई शहर
अपर्णा गिते – कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मुंबई

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR