26.2 C
Latur
Tuesday, November 26, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाड्यातील २७ तहसीलदारांच्या बदल्या

मराठवाड्यातील २७ तहसीलदारांच्या बदल्या

छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच विभागांतील शासकीय अधिका-यांच्या बदल्या केल्या जात आहेत. विशेष म्हणजे महसूल विभागातील वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्यांसोबतच आता तहसीलदारांच्या बदल्यांचा देखील आदेश निघाला आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील तब्बल २७ तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यातील अनेक अधिकारी ब-याच दिवसांपासून एकाच जिल्ह्यात कार्यरत होते.

कोणाची कुठे बदली?
छत्रपती संभाजीनगरच्या तेजस्विनी जाधव यांची बीड येथे बदली, वैशाली डोंगरजाल यांची देऊळगाव (जि. बुलडाणा) येथे बदली, नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सोनाली जोंधळे यांची मंठ्याच्या तहसीलदार म्हणून बदली, सोयगाव येथील मोहनलाल हर्णे यांची शिरूर कासार (जि. बीड) येथे बदली, नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले वैभव विजय महिंद्रकर यांची धर्माबाद येथे बदली, परतूर येथून प्रतिभा गोरे-करंजकर यांची परभणी येथे बदली, रुपा चित्रक यांची संभाजीनगर येथे बदली, पल्लवी टेमकर यांची हिमायतनगर येथे बदली,

ज्योती चव्हाण यांची धाराशिव येथे बदली, राम बोरगावकर यांची उदगीर येथे बदली, उज्ज्वला पांगरकर यांची हिंगोली येथे बदली, हरिश गाडे यांची औंढा नागनाथ येथे बदली, धोंडिबा गायकवाड यांची वाशी येथे बदली, एस. एन. हदेश्वर यांची पाथरी येथे बदली, मंजुषा भगत यांची रेणापूर येथे बदली,

बिपिन पाटील यांची नांदेड येथे बदली, रामेश्वर गोरे यांची कंधार येथे बदली, काशिनाथ हनुमंतराव पाटील यांची लोहारा येथे बदली, शिवानंद बिडवे यांची छत्रपती संभाजीनगर येथे बदली, प्रसाद कुलकर्णी यांची निलंगा येथे बदली, नरसिंग जाधव यांची चाकूर येथे बदली, मनीषा मेने यांची सोयगाव येथे बदली, सुरेश घोळवे यांची भोकर येथे बदली, अश्विनी उमरे यांची बदनापूर येथे बदली, जी. आर. पेदेवाड यांची शिरूर अनंतपाळ येथे बदली, प्रशांत थोरात यांची उमरी येथे बदली, सुजित नरहरी यांची सोलापूर येथे अशा बदल्या करण्यात आल्या आहेत.

पोलिस दलातही मोठे फेरबदल…
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलात देखील मोठे फेरबदल करत पोलिस महासंचालक, अप्पर पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, पोलिस आयुक्त, सहआयुक्त, पोलिस अधीक्षक दर्जाच्या ६४ आयपीएस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश निघाले आहेत. ज्यात, पुण्याचे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांची पोलिस महासंचालक पदावर बढती देत राज्याच्या गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) महासमादेशकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रितेशकुमार यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पुणे पोलिस आयुक्तपदी नागपूर शहरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, राज्याच्या वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक रवींद्रकुमार सिंघल यांना नागपूर शहर पोलिस आयुक्त पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे सर्वच विभागांत अशा बदल्या करण्यात आल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR